दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी टेस्टमध्ये भारताला मिळालेला 408 रन्सचा लाजिरवाणा पराभव भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मोठा धक्का ठरला आहे. घरच्या मैदानावर 25 वर्षांनंतर टेस्ट सिरीज गमावणं आणि एका वर्षात दुसऱ्यांदा क्लीन स्वीप होणं यामुळे टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
सोशल मीडियापासून ते अनेक माजी खेळाडू सर्वजण गंभीरवर टीका करतायत. यावेळी गंभीरला कोचपदावरून हटवण्याची मागणी जोर धरताना दिसतेय. मात्र या सर्व चर्चांदरम्यान BCCI ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेला टीमचा पराभव नक्कीच चिंताजनक आहे. मात्र पण बोर्ड सध्या कोणताही मोठा बदल करण्याच्या मूडमध्ये नाही.
त्यांनी मान्य केलं की, भारतीय फलंदाजांचा घरच्या मैदानावर स्पिनर्सविरूद्ध अपयशी ठरणं हे लाजीरवाणं आहे. पण निर्णय विचारपूर्वक घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
सैकिया यांनी स्पष्ट केलं की, BCCI प्रत्येक पराभवानंतर कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाही. त्यांनी म्हटलं की, “आमच्याकडे दीर्घकालीन योजना आहे. विजय आणि पराभव हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक निकालानंतर त्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. आणि यावेळीही करणार नाही. जर गरज पडली, तर ठराविक वेळेनंतर निर्णय घेतले जातील.”
सैकिया यांच्या या विधानानंतर जवळजवळ स्पष्ट झालंय की, गौतम गंभीर सध्या कोच पदावर कायम राहील. याचाच अर्थ टीम मॅनेजमेंट इतक्यात कोणाताही तातडीने निर्णय घेणार नसून कोचपदी बदल होण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या 13 महिन्यांत भारतीय टीमने टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामिगिरी केली आहे. मात्j जर आपण टेस्ट क्रिकेट पाहिलं तर त्यामध्ये टीम इंडियाचा आलेख उतरता आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये दोनदा व्हाईटवॉश झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
यावर सैकिया म्हणाले की, टीम सध्या मोठ्या बदलाच्या प्रक्रियेतून जातेय. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांसारखे अनुभवी खेळाडू टेस्टमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे नवीन खेळाडूंना स्थिर होण्यासाठी वेळ लागणार आहे.
गुवाहाटीतील बरसापारा पिचवर झालेल्या चर्चांदरम्यान सैकिया म्हणाले की, टीम इंडियाने कोणतेही विशेष निर्देश दिले नव्हते. पिच BCCI चे चीफ क्यूरेटर आशीष भौमिक यांनी स्वतःच्या पद्धतीने तयार केली होती आणि अनेक तज्ज्ञांनी तिला “टेस्ट क्रिकेटसाठी परफेक्ट विकेट” असं म्हटलं होतं.
भारतीय स्पिनर का अपयशी ठरले यावर सैकिया यांनी सांगितलं की, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मुख्य म्हणजे बोर्ड याची सखोल समीक्षा करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.