Gautam Gambhir- Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. हा वाद होऊन ३ दिवस उलटून गेली आहेत. तरीदेखील सोशल मीडियावर विराट - गंभीरच्या वादाची चर्चा सुरू आहे.
लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
या पराभवानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आता गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना रागात पाहताना दिसून येत आहे.
विराटच्या फॅन्सने गंभीरला डिवचलं..
विराट आणि गंभीर यांच्या वादानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो याच प्रकरणाशी जोडलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामान्यादरम्यानचा आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,सामना पाहण्यासाठी आलेले विराटचे फॅन्स गौतम गंबीरला डिवचताना दिसून येत आहेत. लखनऊ आणि चेन्नईचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा सामना झाल्यानंतर जेव्हा गौतम गंभीर पॅव्हेलियनमध्ये जात होता, त्यावेळी काही फॅन्स विराट.. विराटचा नारा देऊ लागले.
हे ऐकून गौतम गंभीर त्या फॅन्सला रंगात बघताना दिसून आला. त्यावेळी अमित मिश्रा देखील होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)
काय आहे प्रकरण?
तर झाले असे की, १ मे रोजी लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना सुरु असताना, विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.
हा सामना झाल्यानंतर जेव्हा खेळाडू हात मिळवणी करत होते, त्यावेळी देखील या दोघांमध्ये बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या प्रकरणात गौतम गंभीरने उडी घेतल्याने हा वाद आणखी वाढला. नवीन उल हकनंतर विराट आणि गंभीर यांच्यात वाद रंगला. संघातील खेळाडूंनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद जास्त वाढला नाही.
या वादानंतर बीसीसीआयने गौतम गंभीर, विराट कोहली आणि नवीन उल हकवर कठोर कारवाई केली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीरवर मॅच फीच्या १०० टक्के, तर नवीन उल हकवर मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या वादा प्रकरणी विराटला १ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र विराट ही रक्कम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ भरणार आहे. त्यामुळे विराटला ही रक्कम भरावी लागणार नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.