gautam gambhir in the top wish list for the new indian head coach for bcci says reports amd2000 google
Sports

Gautam Gambhir: गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा हेड कोच? श्रीलंकेच्या या दिग्गजाचंही नाव आघाडीवर

Gautam Gambhir, Team India Head Coach: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर गौतम गंभीर हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने भावी मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावं समोर आल्याचे पाहायला मिळाले आहे. या पदासाठी अर्ज कऱण्याची शेवटची तारीख २७ मे असणार आहे. बीसीसीआयने या पदासाठी संभावित उमेदवारांची यादी तयार केली आहे. ज्यात गौतम गंभीरचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. (Gautam Gambhir Latest News)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या पदासाठी गौतम गंभीर( कोलकाता नाईट रायडर्स), स्टीफन फ्लेमिंग (चेन्नई सुपर किंग्ज), जस्टीन लेंगर (लखनऊ सुपरजायंट्स) आणि महेला जयवर्धने ( मुंबई इंडियन्स) यांनी रस दाखवला आहे. या वृत्तात असंही म्हटलं आहे की, बोर्ड लवकरच या दिग्गज खेळाडूंशी संपर्क करणार आहे. (Team India head coach news)

टी-२० वर्ल्डकपनंतर नव्या मुख्यप्रशिक्षकाचा कार्यकाळ सुरु होईल. हा कार्यकाळ २०२७ वर्ल्डकपपर्यंत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रशिक्षकाने दिर्घ काळासाठी प्रशिक्षण देण्यास रस दाखवलेला नाही. यापू्र्वी आशीष नेहराचंही नाव चर्चेत होतं. मात्र तिन्ही फॉरमॅटमध्ये दिर्घ काळ प्रशिक्षण देण्यात त्यानेही रस दाखवला नव्हता. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानेही नकार दिला होता. सध्या तो नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख आहे.

बीसीसीआयच्या सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटले की, 'सध्या गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकाचा पदभार स्विकारण्यासाठी आघाडीवर आहे. संभावित उमेदवारांसोबत कुठलाही संवाद साधला गेलेला नाही. हे उमेदवार आपला वेळ वाया घालवत आहेत. मात्र असं दिसून येतंय की, गंभीरचा चान्स वाढला आहे. बोर्ड अधिकारी गौतम गंभीरसोबत चर्चा करु शकतात. गंभीरही अहमदाबादमध्येच आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT