gautam gambhir coaching SAAM TV
Sports

Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

gautam gambhir coaching supreme court test series defeat viral: गौतम गंभीर आणि त्याच्या कोचिंगवर सध्या प्रश्न उपस्थित केले जातायत. अलीकडील टेस्ट मालिकेतील पराभवानंतर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली असून, न्यायाधीशांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्टमध्ये दारूण पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील मुख्य कोच गौतम गंभीरवर टीका केली जातेय. टीम इंडियाचा घरच्या मैदानावरील टेस्ट पराभवाचा काही मुद्दा थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान याचे पडसाद कोर्टातही पडले असून याचा थेट उल्लेख सर्वोच्च न्यायालयातही झाल्याचं पहायाला मिळालं.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी एका सुनावणीदरम्यान टीम इंडियाच्या अलीकडील टेस्ट क्रिकेटमधील खराब कामगिरीचा अनौपचारिक उल्लेख केला. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याशी संवाद साधताना न्यायमूर्ती सुंदरेश यांनी म्हटलंय की, व्हाईट बॉल क्रिकेटवर जास्त लक्ष दिल्यामुळे भारतीय टेस्ट टीमच्या कामगिरीत घसरण झाली आहे.

टेस्टमध्ये भारताची खराब कामगिरी

भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेने दोन टेस्ट सामन्यांच्या घरच्या सिरीजमध्ये क्लीन स्वीप दिल्यानंतर न्यायमूर्ती सुंदरेश यांनी ही टिप्पणी केली आहे. गेल्या 13 महिन्यांत ही दुसरी वेळ होती जेव्हा भारताला एखाद्या परदेशी टीमने घरच्या मैदानावर पराभूत केलं. दोन्ही वेळा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात हे घडलंय. त्यामुळे टेस्ट संघाच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत झालंय.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

न्यायमूर्तींनी केलेली ही टिप्पणी मंगळवारी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये ते म्हणतायत की, “ज्यावेळी तुम्ही T20 आणि ODI वर जास्त लक्ष देता, तेव्हा तुम्ही टेस्ट सामने हराल.” ही त्यांची अनौपचारिक चर्चा होती जी कॅमेऱ्यात कैद झाली.

मुकुल रोहतगी यांचा खुलासा

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, त्यांनी टेस्ट सिरीज हरल्यानंतर अलीकडेच गौतम गंभीर यांच्याशी चर्चा केली होती. ते म्हणाले, “लॉर्डशिप, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर माझे मित्र आणि क्लाएंट दोन्ही आहेत. मी त्यांना फोन करून सांगितलं की, आता संपूर्ण देश म्हणतोय की, जर तुम्ही स्वतःच्या पिचवर अशा प्रकारे हरत असाल, तर तुम्ही थांबलं पाहिजे.”

भारताची सध्याची स्थिती

भारतीय क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळतेय. मात्र पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. आता टीम दुसऱ्या वनडेसाठी रायपूरला पोहोचली आहे. त्यानंतर अंतिम वनडे सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. वनडे सिरीज संपल्यानंतर भारत टी20 वर्ल्डकप 2026च्या तयारीचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 सिरीज खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पाण्याच्या प्रवाहात अडकेलेल्या नागरिकांची सुटका

Panvel Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेल फिकं; पनवेलपासून 150 किमी लांब असलेलं हिल स्टेशन या विकेंडला ठरेल बेस्ट पिकनीक स्पॉट

TET Paper Leak Case: बिहारनंतर आता आग्र्यातून तिघांना अटक, प्रश्नपत्रिका बाहेर काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

LPG Price Today: गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठा बदल! तुमच्या शहरात आज कितीला मिळणार LPG? एकदा नक्की तपासा

Badishep Water Benefits: वजन कमी ते ग्लोईंग स्किन; सकाळी कोमट पाण्यात बडीशेप टाकून प्यायल्याने मिळतात हे फायदे

SCROLL FOR NEXT