भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारीने भारताचा हेड कोच गौतम गंभीरवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज तिवारीने गंभीरला ढोंगी, क्रेडीट चोर आणि पीआरची दुकान असं म्हटलं आहे. मनोज तिवारीने आरोप केल्यानंतर, काही खेळाडू गंभीरच्या समर्थनासाठी पुढे आले. मात्र त्यांनाही मनोज तिवारीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज तिवारीने एक जुना किस्सा सांगताना म्हटले की, ' जेव्हा दिल्लीतील रणजी ट्रॉफीदरम्यान गंभीरने माझ्याशी वाद घातला होता, त्यावेळी तो काय बोलला होता हे सर्वांनी ऐकलं होतं. ते सौरव गांगुलीली उलट सुलट बोलणं असो किंवा माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करणं असो. त्यावेळी त्याला काही लोकांनी वाचवलं होतं. मी पीआरबद्दलच बोलतोय. खेळाडूंची निवड योग्यरित्या होत नाहीये. '
आयपीएल २०२४ स्पर्धेत गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेटाँरची भूमिका बजावली होती. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला होता. त्यावेळी गंभीरला विजयाचं श्रेय दिलं गेलं होतं.
याबाबत बोलताना गंभीर म्हणाला होता की, ' गंभीरने जरा जास्तच क्रेडीट घेतलं. जर गंभीरमुळे कोलकाता नाईट रायडर्सला जिंकवून दिलं, तर मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी काय केलं? हा सर्व पीआरचा खेळ आहे. गंभीर क्रेडीट चोरुन घेतोय.
आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघाचा गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरु लागली होती. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली.
मात्र त्याला ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडता आलेली नाही. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली. यासह भारतीय संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करु शकलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.