Gary Kirsten
Gary Kirsten Saam TV
क्रीडा | IPL

भारताला विश्वचषक जिंकून देणारा दिग्गज होणार इंग्लंडचा कोच, नवा कर्णधारही निश्चित

Pravin

इंग्लंडच्या क्रिकेट (England Cricket Team) संघाचा पुढील कसोटी कर्णधार कोण असेल त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाईल? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. बेन स्टोक्स (Ben Stockes) हा इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार असू शकतो आणि गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) कसोटी संघाचे प्रशिक्षक बनणार असल्याचे वृत्त आहे. इंग्लंडची मागच्या काही काळात कसोटी फॉर्मेटमध्ये कामगिरी खूपच खराब झाली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2022) गुणतालिकेत संघ तळाशी आहे. अॅशेस मालिकेनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर जो रूटने कर्णधारपद सोडले. आता बेन स्टोक्सकडे कसोटी संघाची कमान सोपवली जाऊ शकते. IPL 2022 मध्ये गुजरात लायन्सचे प्रशिक्षक असलेले गॅरी कर्स्टन या स्पर्धेनंतर इंग्लंड्या संघाचे प्रशिक्षक होणार आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, गॅरी कर्स्टन यांना स्वतः इंग्लंडचे प्रशिक्षक बनायचे आहे. गॅरी हे ECB चे नवीन संचालक रॉब यांच्याशी बोलले आहे. इंग्लंडच्या कसोटी संघ आणि एकदिवसीय संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे आहे आणि त्यानंतर 9 मे पासून मुलाखती सुरू होणार आहे.

गॅरी कर्स्टन यांच्या नावावर चांगले रेकॉर्ड

गॅरी कर्स्टन यांचा प्रशिक्षक म्हणून अनुभव विलक्षण आहे. आयपीएल व्यतिरिक्त त्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. त्याच्या प्रशिक्षणात भारताने 2011 मध्ये विश्वचषकही जिंकला होता. गॅरी कर्स्टन 2008 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक बनले आणि त्यांच्या कोचिंगमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर 2-0 असा पराभव केला. याशिवाय भारताने प्रथमच श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले. गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 40 वर्षांनंतर न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली.

गॅरी कर्स्टन स्वतः एक महान फलंदाज होते, ज्याचा फायदा टीम इंडियाच्या फलंदाजांनाही झाला आहे. एका चांगल्या प्रशिक्षणाती गरज इंग्लंडच्या संघाला आहे. गॅरी कर्स्टन यांच्या व्यतिरिक्त ग्रॅहम फोर्ड आणि सायमन कॅटिच हे देखील इंग्लंडचे प्रशिक्षक होण्याचे दावेदार आहेत.

बेन स्टोक्स कर्णधार असेल?

नव्या प्रशिक्षकाशिवाय इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार कोण असेल, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स हा या पदाचा प्रबळ दावेदार आहे. रॉब हे या आठवड्यात स्टोक्सची कर्णधार म्हणून घोषणा करु शकतात. गुरुवारी लॉर्ड्सवर रॉब मीडियाशी संवाद साधणार आहेत. इंग्लंडला 2 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे तर संघ मर्यादित षटकांच्या मालिकेत नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

IRCTC Hotel Service: रेल्वेची नवीन सुविधा...स्टेशनवर मिळणार अवघ्या १०० रुपयांत रुम

Kareena Kapoor: करीना कपूर बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावनिक पोस्ट करत स्वत:च दिली माहिती

Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

SCROLL FOR NEXT