Gabba Stadium Australia Wikipedia
Sports

Gabba Stadium : 130 वर्षे जुनं गाबा स्टेडियम तोडणार? निर्णयामागचं नेमकं कारण काय?

Gabba Stadium Australia : ब्रिस्बेन म्हणजेच गाबा स्टेडियम पाडले जाणार आहे. या स्टेडियमवर २०२१ मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारे हे स्टेडियम तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Yash Shirke

Gabba Stadium News : गाबा स्टेडियम म्हणजेच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियम लवकरच तोडण्यात येणार आहे. २०२१ मध्ये या स्टेडियममध्ये रिषम पंतने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ऐतिहासिक खेळी केली होती. समालोचक विवेक राजदान यांनी 'टूटा है गाबा का घमंड' म्हणत भारताच्या विजयाची घोषणा केली होती. भारताच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष ठरलेले गाबाचे स्टेडियम का तोडले जाणार आहे? चला जाणून घेऊयात...

१८९५ मध्ये गाबा स्टेडियमची स्थापना करण्यात आली होती. या स्टेडियममध्ये ३७,००० दर्शकांना बसण्याची व्यवस्था आहे. १७०.६ मीटर लांब आणि १४९.९ मीटर रुंद अशा या स्टेडियममध्ये दोन स्टँड आहेत. या स्टेडियममध्ये क्रिकेट व्यक्तिरिक्त फुटबॉल, रग्बीसारखे इतर खेळांचे सामने देखील खेळले जातात.

मागील काही वर्षांमध्ये गाबा स्टेडियमची पडझड झाली आहे. मर्यादित पायाभूत क्षमतांमुळे स्टेडियमची अवस्था बिघडत आहे. या स्टेडियमला २०३२ ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक झाल्यानंतर स्टेडियम पूर्णपणे उध्वस्त केले जाणार आहे. त्यानंतर व्हिक्टोरिया पार्कमध्ये ६३ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक स्टेडियम बांधण्यात येईल.

गाबा स्टेडियमचा मोठा इतिहास आहे. अनेक क्रिकेट सामन्यांसह ऑस्टेलिया फुटबॉल लीगचे महत्त्वपूर्ण सामने या स्टेडियममध्ये खेळले गेले आहेत. पण स्टेडियमची स्थिती बिघडत असल्याने स्टेडियम पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या स्टेडियमला नव्या स्वरुपात तयार केले जाईल. नवीन स्टेडियम तयार करण्यासाठी 3.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि तेथील सरकारद्वारे प्रथम गाबा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे नियोजन करण्यात आले होते. पण त्यासाठी जास्त खर्च येत असल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला.आता गाबा स्टेडियम पूर्णपणे पाडून नवीन अत्याधुनिक स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT