ICC Women's T20 WC : SAAM TV
क्रीडा

ICC Women's T20 WC : आज पासून रंगणार ICC महिला T -20 WC स्पर्धेचा थरार: पाहा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Saam TV News

ICC Women's T20 WC:आजपासून आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

या स्पर्धेत सर्वांचे लक्ष हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर असणार आहे. २०२० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने (Indian Womens Team) अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

सहावे जेतेपद मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया उतरणार मैदानात

ऑस्ट्र्रेलिया संघ या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. हा संघ आपले ६ वे जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंड आणि भारतीय महिला संघ त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. गेल्या ७ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. (Latest Sports Updates)

भारतीय संघाच्या फलंदाजांवर असेल मोठी जबाबदारी..

भारतीय संघाला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर, भारतीय संघातील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारतीय संघात हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना सारखे आक्रमक फलंदाज आहेत.

तर पूजा वस्त्राकर आणि घाेष सारखे मोठे फटके खेळणारे फलंदाज देखील आहेत. भारतीय संघाची फलंदाजी मजबूत आहे. मात्र शिखा पांडेला वगळलं तर संघातील इतर गोलंदाजांकडे जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाहीये.

दोन गटांमध्ये केली गेली आहे संघांची विभागणी

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० संघांना २ गटांमध्ये विभागलं गेलं आहे. पहिल्या गटात दक्षिण आफ्रिका , श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे.

तर दुसऱ्या गटात भारत, इंग्लंड, पाकिस्तान,वेस्टइंडीज आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १२ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे.

असे आहे टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक..

१० फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुध्द श्रीलंका, केप टाऊन,रात्री १०:३० वाजता

११ फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुध्द इंग्लंड, पार्ल, संध्याकाळी ६:३० वाजता

११ फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुध्द न्यूझीलंड, पार्ल, रात्री १०:३० वाजता

१२ फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, केप टाऊन, संध्याकाळी ६:३० वाजता

१२ फेब्रुवारी - बांगलादेश विरुध्द श्रीलंका, केप टाऊन, रात्री १०:३० वाजता

१३ फेब्रुवारी - आयर्लंड विरुध्द इंग्लंड, पार्ल , संध्याकाळी ६:३० वाजता

१३ फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुध्द न्यूझीलंड, पार्ल, रात्री १०:३० वाजता

१४ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ, रात्री १०:३० वाजता

१५ फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुध्द भारत, केप टाऊन, संध्याकाळी ६:३० वाजता

१५ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुध्द आयर्लंड, केप टाऊन, रात्री १०:३० वाजता

१६ फेब्रुवारी - श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया, पोर्ट एलिझाबेथ, संध्याकाळी ६:३० वाजता

१७ फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुध्द बांगलादेश, केप टाऊन, संध्याकाळी ६:३० वाजता

१७ फेब्रुवारी - वेस्ट इंडीज विरुध्द आयर्लंड, केप टाऊन, रात्री १०:३० वाजता

१८ फेब्रुवारी - इंग्लंड विरुध्द भारत, पोर्ट एलिझाबेथ, संध्याकाळी ६:३० वाजता

१८ फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलिया, पोर्ट एलिझाबेथ, रात्री १०:३० वाजता

१९ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुध्द वेस्ट इंडीज, पार्ल, संध्याकाळी ६:३० वाजता

१९ फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, पार्ल रात्री १०:३० वाजता

२० फेब्रुवारी - आयर्लंड विरुध्द भारत, पोर्ट एलिझाबेथ, संध्याकाळी ६:३० वाजता

२१ फेब्रुवारी - इंग्लंड विरुध्द पाकिस्तान, केप टाऊन, संध्याकाळी ६:३० वाजता

२१ फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुध्द बांगलादेश, केप टाऊन, रात्री १०:३० वाजता

२३ फेब्रुवारी - पाहिली सेमी फायनल

२४ फेब्रुवारी - दुसरी सेमी फायनल

२६ फेब्रुवारी - अंतिम सामना

असा आहे भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर( कर्णधार), स्म्रिती मंधाना , शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलिन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर,अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे

राखीव खेळाडू : एस मेघना, स्नेह राना, मेघना सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT