Team India Women celebrate World Cup victory as coach Amol Muzumdar receives a heartfelt gesture from captain Harmanpreet Kaur. Saam Tv
Sports

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

The Coach Who Made Dreams Come True: साखळी फेरीत सलग तीन पराभव ते वर्ल्ड कप विजय... आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच हा प्रवास थक्क करणारा आहे... टीम इंडियाच्या या विजयाचं श्रेय खेळाडूंबरोबरच आणखी एका व्यक्तीला जातं... कोण आहे हा व्यक्ती? कसा ठरला तो टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार?

Saam Tv

महिला टीम इंडियाच्या विजयानंतर झळकलेला हा फोटो सर्व काही सांगून जातो... विश्व विजयानंतर कर्णधार हरमनप्रीतने महिला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या पायांना स्पर्श केला आणि सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं ते म्हणज अमोल मुझुमदार.. महिला संघाला वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात खेळाडूंचा जितका वाटा होता तितकाच संघर्ष प्रशिक्षक अमोल मुझुमदारचा होता...

टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, पण महिला क्रिकेट संघाला जेतेपद मिळवून देत अमोलने देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं... शालेय क्रिकेटमध्ये ज्यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी जागतिक विक्रम करणारी खेळी करत होते त्यावेळी अमोल पॅड घालून वाट पहात होता... आणि तेव्हापासून त्याच्या नशिबी प्रतिक्षा करणंच आलं...

सचिन, विनोदप्रमाणेच अमोलही द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांचा शिष्य... रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावा आणी 30 शतकं करुनही भारतीय संघाचा दरवाजा अमोलसाठी कधीच उघडला नाही...

पण अमोल कधीच खचला नाही, 2014 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरला... आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलचा बॅटिंग कोच म्हणून त्याने काम पाहिलं... मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाची धुराही त्याने सांभाळली...

2023 मध्ये अमोल मुझुमदारची भारतीय महिला क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने नवी भरारी घेतली.. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत हुलकावणी देणाऱ्या ब्ल्यू जर्सीला आता त्याने जगभरात नवी ओळख मिळवून दिलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT