bangladesh news Saam tv
Sports

टी२० वर्ल्डकपनंतर उफाळला नवा वाद; एका पाठोपाठ ४ राजीनामे, क्रीडाविश्वात खळबळ

bangladesh news : बांगलादेशात टी२० वर्ल्डकपनंतर नवा वाद उफाळून आला आहे. त्यांच्या बोर्डातील ४ जणांनी राजीनामे दिलेत. यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

बांगलादेश क्रिकेट बोर्डात मोठा वाद उफाळलाय

क्रिकेट बोर्डातील ४ डायरेक्टरचे राजीनामे

बोर्डाच्या निर्णयामुळे वादाला फुटलं तोंड

टी२० विश्वचषक २०२६ आधीपासून बांग्लादेश क्रिकेट बोर्ड वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना भारतात क्रिकेट खेळायला जाण्यात नकार दिला होता. त्यांच्या बोर्डाने सामने श्रीलंकेत ठेवण्याची मागणी केली होती. परंतु बांगलादेश बोर्डाची मागणी आयसीसी फेटाळून लावली होती. त्यामुळे बांगलादेश संघाला टी२० वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास संधी मिळाली नव्हती. त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात त्यांच्या सरकारची ढवळाढवळ पाहायला मिळाली होती. आता बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डावर नवं संकट निर्माण झालं आहे. बोर्डातील ४ जणांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांनी बोर्डात ६ महिन्यांपेक्षा अधिक काम केलं नाही. आतापर्यंत २५ पैकी ७ बोर्ड डायरेक्टरने राजीनामा दिला आहे. यातील ४ जणांनी शनिवारच्या बैठकीनंतर राजीनामे दिले. या राजीनाम्यामुळे बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीबीचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम पद सोडण्यास तयार नाही. मागील वर्षी निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप आहे. यानंतर चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर या चौकशीचा अहवाल सरकारकडे सोपवण्यात आला होता. फार कमी निवडणुका व्यवस्थित झाल्याच्या अहवालातून समोर आलं.

बांगलादेश क्रिकेट बोर्डातील ४ डायरेक्टर सानियान तनीम, मेहराब आलम, फैयाजूर रहमान आणि मंजुरल आलम यांनी ४ एप्रिल रोजी राजीनामा दिला. ESPNCricinfo च्या रिपोर्टनुसार, अमीनुल यांनी शनिवारी म्हटलं की, मी माझ्या खुर्चीवर बसून राहणार. मी अजून काय करू शकतो. मी बोर्डातून जाणारा शेवटचा व्यक्ती ठरेल. माझ्याजवळ चांगला आणि प्रामाणिक संघ आहे. मी या संघासोबत बांगलादेश क्रिकेटची सेवा करू इच्छित आहे.

'मी आयसीसीमध्ये काम करणारा एकटाच बांगलादेशी होतो. मी फार मोठा आहे, असं मला सांगायचा नाही. परंतु मी अनुभवाने खूप मोठा आहे. मी आपल्या देशाला पाठिंबा देण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला. या मार्गातून होत नसेल, तर मी दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करेल. पण माझ्या देशाला पाठिंबा देईल. आपला क्रिकेट संघ चांगला असून प्रामाणिक आहे. मी संघासोबत काम करू इच्छित आहे. बांगलादेश क्रिकेटची सेवा करू करू इच्छित आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT