ऐकलतं....'भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे... मात्र त्याचं पर्संटेज कमी असायला हवं... अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वासाधारण सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटलांनीच थेट भ्रष्टाचाराचं समर्थन केलं...सर्वसाधारण सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान सदाशिव पाटलांनी हे विधान केलं... त्यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र उपनगराध्यक्ष काही थांबायला तयारचं नव्हते...
उपनगराध्यक्षांच्या या विधानानंतर वाद पेटला... आणि सभागृहात खरं बोलायला भीती कसली असं म्हणणाऱ्या उपनगराध्यक्षांनी सभागृहाबाहेर येताच मात्र घुमजाव केलं...एवढच नाही तर कॅमेरे बंद होताच उपनगराध्यक्षांचा सूर बदलला आणि त्यांनी थेट पत्रकारांना दमदाटी करायला सुरुवात केली. नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी मात्र या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिलीय...
ना खाऊंगा ना खिलाऊंगा ही घोषणा कधीच हवेत विरलीय..यंत्रणांमध्ये भ्रष्टाचाराची कीड इतकी खोलवर रूजलीय की ती आता सर्वमान्य झालीय का असा प्रश्न पडतोय..निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच सभागृहात जाहीरपणे भ्रष्टाचाराचं आणि चोरीचं समर्थन कसं काय करू शकतात आणि मग अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी नेमकी दाद तरी कुणाकडे मागायची... हा खरा प्रश्न आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.