Shoaib Akhtar Became a Father for the Third Time Saam Tv
क्रीडा

Shoaib Akhtar Becomes Father: शोएब अख्तरच्या घरी झालं चिमुकलीचं आगमन; ४८ वर्षीय तिसऱ्यांदा झाला बाबा

Shoaib Akhtar News: शोएब अख्तरने रुबाब खानसोबत २०१४ मध्ये खैबर पख्तुनख्वामध्ये लग्न केले. शोएबचे लग्न झाले तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर त्याची पत्नी रुबाब २० वर्षांची होती.

Bharat Jadhav

Shoaib Akhtar Becomes Father :

'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज तिसऱ्यांदा बाबा झालाय. शोएब अख्तरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालंय. सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं ही माहिती दिली. मिकाईल आणि मुजद्दीद यांना आता एक लहान बहीण मिळालीय. १ मार्च २०२४ रोजी जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचं या जगात स्वागत असं त्याने पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय. (Latest News)

शोएब आणि त्याची पत्नी रुबाब खान यांना आधीच दोन मुलं आहेत. मोहम्मद मिकाईल अली हा मोठा मुलगा आहे, त्याचा जन्म २०१६ मध्ये झाला. त्यानंतर तीन वर्षांनंतर मुजद्दीद अली याचा जन्म झाला. शोएब अख्तरने रुबाब खानसोबत २०१४ मध्ये खैबर पख्तुनख्वामध्ये लग्न केले. शोएबचे लग्न झाले तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर त्याची पत्नी रुबाब २० वर्षांची होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. मात्र, तो मागील काही कालावधीपासून सोशल मीडियापासून दूर होता. क्रिकेटच्या चालू घडामोडींवर भाष्य करणारा अख्तर नाना कारणांनी प्रसिद्धीच्या झोतात असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT