cricket canva
Sports

Cricketers Death: दुःखद बातमी! दिग्गज क्रिकेटपटूचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन

Milind Rege Passed Away: मुंबईचे दिग्गज खेळाडू मिलिंद रेगे यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Ankush Dhavre

आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे. मिलिंद रेगे यांनी मुंबई क्रिकेटला अमूल्य असं योगदाज दिलं.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी मार्गदर्शक आणि निवड समिती सदस्यांसह अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

मिलिंद रेगे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४९ ला झाला. त्यांना ११६७-६८ ते १९७७-७८ या कालावधीदरम्यान मुंबई क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी निवड समिती अध्यक्ष म्हणून देखील भूमिका बजावली. मिलिंद रेगे हे वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यातील मुंबई संघातील हयात असलेल्या ८ खेळाडूंपैकी एक होते.

मिलिंद रेगेंबद्दल बोलायचं झालं, तर ते उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू होते. गोलंदाजीत ते ऑफ ब्रेक गोलंदाजी करायचे आणि फलंदाजीत ते उजव्या हाताचे फलंदाज होते. त्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५२ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांना काही सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व केले.

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही ते मुंबई क्रिकेटशी जोडून होते. त्यांनी २० वर्षांहून अधिक वर्ष क्रिकेट असोसिएशनच्या उपसमिंत्यासाठी काम केले. १९८० पासून त्यांनी मुंबई निवड समितीचे सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT