Paul Valthaty News saam tv news
Sports

Mumbai Fire News: भारतीय क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर! मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत बहीण आणि भाचीचा मृत्यू

Paul Valthaty News: आयपीएल क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ankush Dhavre

Paul Valthaty Sister And Nephew News:

मुंबईतील बोरिवलीतील मानपाडा परिसरातील वीणा संतूर या इमारतीला आग लागल्याची घटना सोमवारी (२३ ऑक्टोबर) समोर आली आहे. या घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या लोकांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत पावलेली महिला ही क्रिकेटपटू पॉल वल्थाटीची बहिण (Paul Valthaty Sister) आहे. त्याची बहिण ग्लोरी ही आपल्या पती आणि दोन मुलांसह युकेवरून मुंबईत आली होती.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, ही आग दुपारी १२:३० च्या सुमारास लागली होती. आग ईमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली त्यानंतर ही आग वाढत सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर फायर ब्रिगेडच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. (Latest sports updates)

या आगीच्या घटनेत एका लहान मुलासह दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत.जोसू रॉबर्ट (८ वर्ष),ग्लोरी वालफाटी (४३ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. राजेश्वरी भरतरे (२४ वर्ष),लक्ष्मी बुरा (४० वर्ष) आणि राजन शहा (७६ वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पॉल वल्थाटीने आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या स्पर्धेतील २३ सामन्यांमध्ये त्याने ५०५ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतक झळकावली. त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT