टीम इंडियाचा माजी विकेटकीपर फलंदाज नमन ओझा याला एक मोठा धक्का बसला आहे. नमनचे वडील विनय ओझा यांना तुरूंगवासाची शिक्षा दिली आहे. बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात नमनच्या वडिलांना ७ वर्षांची शिक्षा झालीये. या प्रकरणाचा निकाल तब्बल 11 वर्षांनंतर समोर आला आहे.
विनय ओझा यांना मध्य प्रदेशातील बैतूल इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी विनयसह 4 जणांना शिक्षा ठोठावण्यात आलीये. 2013 मध्ये बैतूलच्या मुलताई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जौलखेडा गावात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत 1.25 कोटींचा घोटाळा झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मुलताई अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र बँक शाखा जौलखेडा इथल्या गैरव्यवहार प्रकरणी निकाल दिला. या प्रसिद्ध प्रकरणातील मास्टरमाईंड अभिषेक रत्नम आणि इतर आरोपींना शिक्षा झालीये.
अभिषेक रत्नमला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये विनय ओझा हे त्यावेळी बँकेत असिस्टंट मॅनेजर पदावर होते. पोलिसांनी विनय यांनाही आरोपी म्हणून दोषी करार दिला असून त्यांना ७ वर्षांचा कारावास आणि ७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय बँकेत दलालीचे काम करणारे धनराज पवार आणि लखन हिंगवे यांना 7 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 7 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार अभिषेक रत्नम असून त्याने २०१३ मध्ये बँक अधिकाऱ्यांचे पासवर्ड वापरून हा घोटाळा केला होता. त्यावेळी माजी क्रिकेटपटू नमन ओझा यांचे वडील विनय ओझा हेही याच बँकेत कार्यरत होते. या गैरव्यवहार प्रकरणात त्यांचं नावही पुढे आलं होतं.
नमन ओझाने एक टेस्ट आणि एक वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यामध्ये त्याने टेस्टमध्ये 56 रन्स आणि वनडे सामन्यात 1 रन केल्याची नोंद आहे. याशिवाय त्याने 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळलेत. ज्यामध्ये त्याने 12 रन्स केले आहेत. नमन ओझाने आयपीएलमध्येही चांगली खेळी केली असून एकूण 113 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 1554 धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.