rohit sharma with ravi shastri google
क्रीडा

IND vs SA: 'ही खूप मोठी चूक केलीये..', रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रवी शास्त्रींनी घेतली शाळा

Ankush Dhavre

Ravi Shastri On Rohit Sharma Captaincy:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर आहे. या सामन्यात रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करताना दिसून येत आहे. दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २४५ धावांवर आटोपला. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी २५६ धावा खर्च केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने शतकी खेळी केली. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच हल्लाबोल केला. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर रोहितने गोलंदाजीची जबाबदारी प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरच्या हाती सोपवला. (Latest sports updates)

रोहितने केली ही मोठी चूक..

स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना रवी शास्त्री म्हणाले की, ' पेकिंग ऑर्डरमध्ये या गोलंदाजांनी सर्वात शेवटी गोलंदाजी करायला हवी होती. कुठल्याही पेकींग ऑर्डरमध्ये शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा हे सर्वात शेवटी गोलंदाजीला येतील. जेव्हा मी कोच होतो तेव्हा आम्ही यावर अनेकदा चर्चा केली होती. सत्राची सुरुवात ही नेहमी आपल्या मुख्य गोलंदाजांपासून करायची असते.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' जर तुम्ही पाहिलं तर भारतीय संघाने सुरुवातीच्या १ तासातच मोठी ट्रिक मिस केली आहे. या २ गोलंदाजांसोबत सुरुवात करून रोहितने खूप मोठी चूक केली आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ५ गडी बाद २५६ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT