sunil gavaskar irfan pathan saam tv
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गावसकर- इरफानने निवडला संघ; विराट- रोहितचं काय?

Irfan Pathan- Sunil Gavaskar Squad For ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुनील गावसकर आणि इरफान पठाणने भारताचा स्क्वाड निवडला आहे.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. ज्यात दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या देशांचा समावेश आहे.

मात्र भारतीय संघाने अजूनही आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स तर्क वितर्क लावताना दिसून येत आहेत. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि सुनील गावसकर यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभावित संघ निवडला आहे.

इरफान पठाण आणि सुनील गावसकर यांनी निवडलेल्या संघातून अनेक स्टार खेळाडू गायब आहेत. ज्यात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. तर रियान पराग, रवि बिश्नोई आणि शिवम दुबे यांना देखील या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

काय म्हणाले सुनील गावसकर?

सुनील गावसकर म्हणाले की,' जर मी निवडकर्ता असतो, तर मी हेच पाहिलं असतं की, कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मला वाटतंय की, श्रेयस अय्यरला हवा तितका सपोर्ट मिळालेला नाही. मी या दोन्ही खेळाडूंना नक्कीच संघात ठेवलं असतं. माझ्यासाठी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर असेल. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आणि सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत असेल. यासह संजू सॅमसनसारखा खेळाडूही संघात असणं तितकंच महत्वाचं आहे.'

वेगवान गोलंदाज म्हणून कोणाला संधी?

इरफान पठाणच्या मते, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे दोघेही खेळताना दिसून येऊ शकतो. तर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे मुख्य गोलंदाज असतील आणि तिसरा गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज आणि नीतीश कुमार रेड्डी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT