team india saam tv
क्रीडा

Venkatesh Prasad Statement: 'लाज वाटू द्या!', IND vs PAK ला स्पेशल ट्रिटमेंट दिल्याने माजी क्रिकेटपटू भडकला; म्हणाला...

Venkatesh Prasad On Asia Cup: माजी भारतीय क्रिकेटपटू जोरदार भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Venkatesh Prasad Statement On Ind vs Pak Match:

आशिया चषकात सुपर ४ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. सुपर ४ फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रंगला होता.

आशिया चषकात सुपर ४ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. सुपर ४ फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.

तर सुपर ४ फेरीतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. तर सुपर ४ फेरीतील उर्वरीत कुठल्याच सामन्यासाठी राखीव दिवस उपलब्ध नसणार असल्याची घोषणा आशियाई क्रिकेट मंडळाने केली आहे.

आता यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू या निर्णयावरून जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस..

भारत - पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे धुतला गेला होता. आता या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ चा सामना रंगणार आहे. हा सामना १० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

मात्र हा सामना जर पूर्ण होऊ शकला नाही, तर हा सामना ११ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. कोलंबोच्या मैदानावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना देखील सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यासाठी राखीव दिवस नसणार आहे.

माजी खेळाडू भडकले..

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद या निर्णयावरून भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की,'लाज वाटू द्या..दोन संघांसाठी वेगळे नियम तयार करणं हे अनैतिक आहे. आयोजकांनी स्पर्धेची खिल्ली उडवली आहे. खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा पहिल्या दिवशी पाऊस पडेल आणि हा सामना राखीव दिवसावर जाईल. राखीव दिवशी आणखी जास्त पाऊस पडला पाहिजे आणि या योजना अयशस्वी ठरल्या पाहीजे.' (Latest sports updates)

बोर्डाला धरलं धारेवर..

वेंकटेश प्रसाद यांनी श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेटवर निशाना साधला आहे. तुमच्यावर ही अनैतिक मागणीचा स्वीकार करण्यासाठी कशाचा दबाव होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भारत- पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसराही सामना पावसामुळे रद्द होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, राजकीय हालचालींना वेग

Daily Horoscope: आज 'या' 3 राशींना पावणार लक्ष्मी; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आयुष्याची लय सापडेल, तर कोणाची होईल आर्थिक भरभराट; तुमची रास यात आहे का?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता 'या' तारखेला येणार; मोठी अपडेट आली समोर

Maharashtra weather : राज्यात गारठा वाढला, हुडहुडी वाढली, किमान तापमान १० अंशांखाली

SCROLL FOR NEXT