former indian cricketer sunil gavaskar raised question decision on release of jasprit bumrah from ind vs eng 4th test yandex
Sports

Sunil Gavaskar Statement: '२३ ओव्हर्स टाकूनच थकला..' बुमराहला विश्रांती देण्यावरुन माजी क्रिकेटपटू भडकले

Sunil Gavaskar On Jasprit Bumrah: भारत- इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातून बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. यावरुन माजी भारतीय क्रिकेटपटू भडकले आहेत.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar On Jasprit Bumrah:

सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने आघाडी घेतली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाकडून सर्वाधिक १७ गडी बाद केले आहेत. सुरुवातीचे ३ सामने खेळल्यानंतर त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली होती. आता त्याला विश्रांती देण्यावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

या मालिकेत भारतीय संघाला एकापेक्षा एक मोठे धक्के बसले आहेत. संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि मोहम्मद शमी मालिका सुरु होण्यापूर्वीच मालिकेतून बाहेर झाले होते. तर मालिका सुरु झाल्यानंतर केएल राहुल देखील मालिकेतून बाहेर पडला आहे. असं असताना वर्कलोड मॅनेजमेंटसाठी बुमराहला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती.

सुनील गावसकर म्हणाले की, ' राजकोट कसोटीतील पहिल्या डावात १५ आणि दुसऱ्या डावात ८ षटक गोलंदाजदी केल्यानंतर बुमराहला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.' (Cricket news in marathi)

'तुम्ही हे विसरु नका की दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ९ दिवसांचा ब्रेक होता. संपूर्ण सामन्यात २३ षटकं गोलंदाजी करणं हे थकवा देणारं नाही. मग बुमराहला विश्रांती का दिली गेली? चौथा कसोटी सामना झाल्यानंतर ९ दिवसांचा ब्रेक मिळणार होता. हा खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी पुरेसा वेळ आहे.' असं सुनील गावसकर म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, ' चौथा कसोटी सामना संघासाठी अतिशय महत्वाचा होता. जर इंग्लंडने हा सामना जिंकला असता तर अंतिम सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक राहिला असता. त्यामुळे एनसीए असो किंवा बुमराह, ज्याने कोणी हा निर्णय घेतला तो निर्णय भारतीय संघासाठी योग्य नव्हता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT