Sunil Gavaskar with wife Saam TV
Sports

Sunil Gavaskar's Love Story: फॅन गर्लच्या प्रेमात पडली सुनील गावसकरांची विकेट;घराचा पत्ता शोधून घातली लग्नाची मागणी!वाचा किस्सा

Sunil and Marshneil Gavaskar's Love Story: भारतीय संघाचे लिटील मास्टर सुनील गावसकर आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले. ज्यात लाला अमरनाथपासून ते रोहित शर्मा अन् विराट कोहली यांचा समावेश आहे. या क्रिकेटपटूंच्या नावे अनेक मोठमोठ्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे. मात्र एक फलंदाज असाही होता, जो हेल्मेट न घालता वेगवान गोलंदाजांचा तोफखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्टइंडिजचं गोलंदाजी आक्रमण फोडून काढायचा. एकवेळ अशी होती, जेव्हा वेस्टइंडिजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाज थरथर कापायचे. त्यावेळी ५.५ फूट उंचीचे सुनील गावसकर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायचे. दरम्यान सुनील गावसकर आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान जाणून घ्या, त्यांच्या आयुष्यातील रोमांचक किस्सा.

सुनील गावसकर यांची लव्ह स्टोरी ही त्यांच्या क्रिकेट प्रवासासारखीच रोमांचक आहे. भारताचे लिटील मास्टर मार्शलीन मल्होत्रा यांच्या प्रेमात पडले होते. मार्शलीन मल्होत्रा या सुनील गावसकर यांच्या फॅन होत्या. दोघांची पहिली भेट ऑटोग्राफ घेत असताना झाली होती. सुनील गावसकर मुंबईकर तर मार्शलीन मल्होत्रा या मुळच्या कानपूरच्या आहेत.

मार्शलीन मल्होत्रा या दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून आपलं बीएचं शिक्षण पूर्ण करत होत्या. त्यावेळी मार्शलीन मल्होत्रा या सुनील गावसकरांचा सामना पाहण्यासाठी मैदानात आल्या आहेत. लंचच्या वेळी सुनील गावसकर गॅलरीत येऊन उभे होते, त्यावेळी मार्शलीन मल्होत्रा त्यांच्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी आल्या.

सुनील गावसकर पहिल्याच नजरेत मार्शलीन मल्होत्रा यांच्या प्रेमात पडले होत्या. सुनील गावसकर आपल्या प्रेमात आहेत, याबाबत मार्शलीन मल्होत्रा यांना काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर सुनील गावसकरांनी त्यांचा पत्ता शोधून काढला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या घराभोवती फेऱ्या देखील मारल्या होत्या.

कानपूरमध्ये जाऊन घातली लग्नाची मागणी

भारतीय संघाचा कानपूरमध्ये सामना होणार होता. त्यावेळी सुनील गावसकरांनी मार्शलीन मल्होत्रा यांच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि त्यांच्या घरासमोर जाऊन लग्नाची मागणी घातली होती. इतकेच नव्हे तर, सुनील गावसकरांनी मार्शलीन मल्होत्रा आणि संपुर्ण कुटुंबाला सामना पाहण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. दोघेही २३ सप्टेंबर १९७४ रोजी विवाह बंधनात अडकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT