rohit sharma hardik pandya  yandex
Sports

Sourav Ganguly Statement: रोहित की हार्दिक; कोणाला मिळायला हवं टी-२० संघाचं कर्णधारपद? सौरव गांगुलींनी सुचवला पर्याय

Sourav Ganguly On Rohit Sharma: आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

Sourav Ganguly On Rohit Sharma Captaincy In T20 World Cup:

आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं असून येत्या १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, रोहित शर्मा हाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार. तर हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असेल. रोहितला कर्णधार बनवताच भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा टी-२० क्रिकेटमधील घातक फलंदाज आहे. मात्र २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर तो टी-२० क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याने कर्णधार म्हणून कमबॅक केलं होतं. इतका मोठा ब्रेक घेतल्यानंतर रोहित शर्मा टी-२० क्रिकेट खेळणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. (Cricket news in marathi)

रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत बोलताना सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहितला संघाचं कर्णधारपद देणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या पद्धतीने त्याने संघाचं नेतृत्व केलं आहे आणि वर्ल्डकपमध्ये १० सामने जिंकले, त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे रोहित या सर्वोत्तम पर्याय आहे. (Sourav Ganguly On Rohit Sharma)

तसेच त्यांनी भारत- इंग्लंड कसोटी मालिकेबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले की,' बॅझबॉल ठीक आहे. पण हे भारतात सक्सेसफुल होणं जरा कठीण आहे. जर भारतीय संघाने मालिका गमावली तर मला आश्चर्य होईल. तु्म्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, भारतीय संघ विराट आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरला आहे. युवा खेळाडूंसमोर इंग्लंडचा संघ संघर्ष करतोय.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT