Ravi Shastri On Virat Kohli saam tv
क्रीडा

Ravi Shastri On Virat Kohli: 'दुसरा सचिन होऊ शकणार नाही..',विराटच्या खेळीवर रवी शास्त्रींचं मोठं विधान

Ankush Dhavre

Ravi Shastri On Virat Kohli:

पाकिस्तानविरूद्ध जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा विराटची बॅट चांगलीच तळपते. सोमवारी झालेल्या सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. या सामन्यात विराटने भारतीय संघाकडून सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली.

या खेळीसह त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४७ वे शतक पूर्ण केले आहे. या खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. दरम्यान रवी शास्त्रींनी विराटबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीची खेळी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्रीही त्याचे फॅन झाले आहेत. विराटबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'यापुढे दुसरा सचिन होऊ शकत नाही,मात्र दुसरा विराटही होऊ शकणार नाही..'विराटने या डावात ९४ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने १२२ धावांची खेळी केली.

मोडले हे मोठे रेकॉर्ड्स..

विराटने या खेळीसह अनेक मोठ मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. या डावात त्याने वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तो वनडेत सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. तसेच वनडेत १३ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (१८,४२६),कुमार संगकारा (१४,२३४),रिकी पाँटिंग(१३,७०४) आणि सनथ जयसूर्या (१३,४३०) यांचा समावेश आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा जोरदार विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २ गडी बाद ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२२ तर केएल राहुलने १११ धावांची खेळी केली.

सलामीला आलेल्या रोहितने ५६ तर शुबमन गिलने ५८ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दिलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १२८ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारतीय आशिया चषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT