hardik pandya and rahul dravid saam tv
Sports

Team India News: टीम इंडियात झालेत २ गट? पंड्या अन् द्रविड यांच्यात बिनसलंय का? दिग्गज खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Parthiv Patel Statement: भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पंड्यासह प्रशिक्षक राहुल द्रविडवर देखील जोरदार टीका केली जात आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Captaincy: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाही.

हे सामने गमावल्यानंतर आता तिसरा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जर हा सामना भारतीय संघाने गमावला तर मालिका देखील गमवावी लागणार आहे.

या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पंड्यासह प्रशिक्षक राहुल द्रविडवर देखील जोरदार टीका केली जात आहे.

बलाढ्य भारतीय संघ वर्ल्डकपसाठी पात्र न ठरलेल्या वेस्टइंडीज संघाकडून पराभूत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आता भारतीय संघावर मालिका गमावण्याचं संकट आहे. सलग २ पराभवानंतर आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसऱ्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्याने काही चुकीचे निर्णय घेतले. ज्यात युजवेंद्र चहलला ओव्हर न देण्याच्या निर्णयाचा देखील समावेश होता.

द्रविड आणि पंड्या यांच्यात काही बिघडलंय?

हार्दिक पंड्याला आयपीएल २०२२ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद दिले गेले होते. या हंगामात त्याने गुजरातला चॅम्पियन बनवलं होतं. तर सलग दुसऱ्या हंगामात त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. तर टी -२० वर्ल्डकप २०२१ नंतर राहुल द्रविडला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद दिले गेले होते.

द्रविडचा अनुभव भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल असं वाटलं होतं. मात्र २ वर्षे होऊनही भारतीय संघाला आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पंड्यासह मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा देखील मोलाचा वाटा होता.

आता माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलचं म्हणणं आहे की, हार्दिकला जो सपोर्ट आशिष नेहराकडून मिळायचा तो राहुल द्रविडकडून मिळत नाहीये. (Latest sports updates)

क्रिकबझवर बोलताना हार्दिक पंड्याने म्हटले की, ' हार्दिकला जो सपोर्ट आशीष नेहराकडून मिळत होता, तो राहुल द्रविडकडून मिळत नाहीये. टी -२० फॉरमॅटमध्ये सक्रिय प्रशिक्षकाची गरज असते. राहुल द्रविड तितका सक्रिय आहे का? मला मुळीच वाटत नाही की, तो तितका सक्रिय आहे. हार्दिक पंड्याकडे ते कौशल्य आहे. मात्र त्याला द्रविडकडून हवा तितका सपोर्ट मिळत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT