aijt agarkar saam tv
Sports

BCCI New Chief Selector: मराठमोळ्या Ajit Agarkar ला BCCI कडून मिळाली मोठी जबाबदारी! वर्षाला मिळणार तब्बल इतके कोटी..

Chief Selector Of BCCI: भारतीय संघाचा माजी खेळाडू अजित आगरकरला बीसीसीआयकडून मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Ankush Dhavre

Salary Of BCCI Chief Selector: भारतीय संघाचा माजी खेळाडू अजित आगरकरला (Ajit Agarkar) बीसीसीआयकडून मोठी जबाबदारी मिळाली आहे. यापुढे तो चिफ सिलेक्टरची भूमिका पार बजावताना दिसून येणार आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर टी -२० मालिकेसाठी आता अजित आगरकर भारतीय संघाची निवड करणार आहे. (BCCI Chief Selector)

गेल्या काही दिवसांपासून अजित आगरकर हे नाव प्रचंड चर्चेत होतं. चिफ सिलेक्टर पदासाठी अजित आगरकर हा प्रबळ दावेदार मानला जात होता. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता. तो सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होता. मात्र चिफ सिलेक्टरचं पद मिळणार असल्याने त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. (Salary Of BCCI Chief Selector)

बीसीसीआयच्या चिफ सिलेक्टर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून होती. या पदासाठी अजित आगरकरने देखील अर्ज केला होता. (Latest sports updates)

अशी राहिली आहे कारकीर्द..

अजित आगरकरने २६ कसोटी सामने खेळताना ५९ गडी बाद केले आहेत. तर १९१ वनडे सामने खेळताना २८८ गडी बाद केले आहेत. यासह ४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने ३ गडी बाद केले आहेत. तर आयपीएल स्पर्धेत त्याने ४२ सामने खेळताना २९ फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील त्याने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १६.७९ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या आहेत. तर १९१ वनडे सामन्यांमध्ये १४.५९ च्या सरासरीने १२६९ धावा केल्या आहेत.

अजित आगरकरचा कार्यकाळ ५ जुलैपासून सुरू होणार आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी संघाची निवड करणार आहे.

त्यानंतर आशिया चषक, वनडे वर्ल्ड कप आणि टी -२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड करण्याची जबाबदारी अजित आगरकरवर असणार आहे. तसेच या पदावर विराजमान होताच त्याला वर्षाला १ कोटी मानधन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: लग्नाच्या कारणावरून तरुणाचा मोबाईल टॉवरवर चढून हायव्होल्टेज ड्रामा

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

रत्नागिरीत थरारक अपघात! पोलीस गाडीला चिरडत २२ चाकांचा महाकाय कंटेनर दरीत; एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

विद्यार्थ्यांसाठी १२८ दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर; 16 दिवसांची दिवाळीची सुट्टी; 24 नोव्हेंबरला ही सुट्टी

SCROLL FOR NEXT