माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीची नोटीस.
अवैध सट्टेबाजी अॅप 1xBet संदर्भात चौकशी.
मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबाब नोंदवला जाणार.
Suresh Raina ED questioning in illegal betting app case : भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ उडावणारी बातमी समोर आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला ईडीकडून नोटीस मिळाली आहे. आज सुरेश रैनाची चौकशी होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या अॅपसंदर्भात ईडीकडून रैनाला नोटीस पाठवण्यात आली आहे. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेश रैना आज कथित अवैध ऑनलाईन सट्टेबाजी अॅपशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर होऊ शकतो. फेडरल तपास यंत्रणा मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत त्याचा जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. सुरेश रैनाला ईडीची नोटीस आल्यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैना याला 1xBet या अॅपच्या संदर्भात अवैध सट्टेबाजीच्या प्रकरणात चौकशीसाठी १३ ऑगस्ट रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. माझी क्रिकेटपटू सुरैश रैना काही जाहिरातीच्या माध्यमातून या अॅपसोबत जोडला गेला आहे.
चौकशीदरम्यान या अॅपशी सुरैश रैनाचा संबंध ईडी अधिकारी समजून घेण्याची शक्यता आहे. ईडीकडून अनेक अवैध सट्टेबाजी अॅप्सशी संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यात येत आहे. अनेक लोक आणि गुंतवणूकदारांकडून अॅपवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक किंवा मोठ्या प्रमाणात करचोरीचा आरोप आहे.
सुरेश रैनाला भारताचा यशस्वी खेळाडूपैकी एक मानले जाते. तो सर्वात यशस्वी मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक होता. सुरैश रैनाने ३२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याशिवाय, कसोटीच्या तिन्ही प्रारूपांमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते. आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये त्यांनी ५५२८ धावा केल्या आहेत. सीएसकाला चार वेळा चॅम्पियन बनवण्यात रैनाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये रैनाचे मोठं योगदान राहिलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.