former cricketer gopinath death Saam tv
Sports

भारताचा माजी क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड; क्रीडाविश्वात शोककळा

former cricketer gopinath death : भारताचा माजी क्रिकेटपटू गोपीनाथ यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

भारताचा माजी क्रिकेटपटू गोपीनाथ यांचं निधन

त्यानी वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बीसीसीआयनेही त्यांना वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी क्रिकेटपटू सीडी गोपीनाथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट जिंकणाऱ्या भारतीय संघात त्यांचाही समावेश होता. त्यांच्या जाण्याने क्रीडाविश्वास शोककळा पसरली आहे. बीसीसीआयनेही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ऑस्ट्रेलिया दिग्गज क्रिकेटपटू नील हार्वे हे ९७ वर्ष जगले. तर गोपीनाथ यांनी १९५५ साली न्यूझीलंडच्या विरोधात कसोटी सामना खेळला होता. गोपीनाथ यांनी भारतासाठी ८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी एका अर्धशतकाच्या मदतीने २४२ धावा केल्या आहेत. गोपीनाथ यांनी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९५१ साली ब्रेबोर्नमधून इंग्लंडच्या विरोधात ५० आणि ४२ धावा कुटल्या होत्या. १९५२ साली इंग्लंड दौऱ्यात त्यांनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळे पुढे त्यांचं भारतीय संघात स्थान कायम राहिलं नाही.

गोपीनाथ यांनी घरगुती क्रिकेटमध्ये मद्रास संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यांनी मद्रास संघाचं कर्णधारपद भुषवलं होतं. त्यांनी ८३ सामन्यात ४२ च्या सरासरीने ४२५९ धावा केल्या. त्यांनी ९ शतक देखील केले आहेत. त्यांनी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना १७५ धावा केल्या होत्या. त्यावेली न्यूझीलंडच्या संघात बर्ट सटक्लिफ, जॉन रीड, जॉन एलाबस्टर आणि पार्क जिनजन हॅरिस सारखे खेळाडू होते. त्यावेळी टीम इंडियाने सामना गमावला होता. परंतु गोपीनाथ यांच्या खेळीचं अनेकांनी कौतुक केलं होतं.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानी संघात क्रिकेटपटूंना निवडण्याच्या भूमिकेत महत्वाची भूमिका निभावली. त्यांनी १९७९ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाचे मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. या दौऱ्यात सुनील गावस्कर यांनी २२१ साली धावा कुटल्या होत्या. त्यांनी केलेल्या दुहेरी शतकाच्या जोरावर भारताच्या विरोधी संघानी दिलेल्या ४३८ धावांच्या टार्गेटपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारतीय संघ २२९ धावांवर गारद झाला होता. ही टेस्ट ड्रॉ झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Party : सरकारची चूक! शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; कॉकरोच पार्टीचा संताप

Death News : प्रसिद्ध कलाकाराचे निधन; पार्कमध्ये कोसळला अन्..., मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची CBI करणार चौकशी

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT