Harbhajan Singh  Saam Tv
क्रीडा

आपची घोषणा; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगसह ५ जणांना राज्यसभेवर पाठवणार

आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभा निवडणुकीकरिता (election) आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभा निवडणुकीकरिता (election) आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंजाब (Punjab) विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 'आप' ने ९२ जागा जिंकल्या आहेत. या मोठ्या विजयानंतर आता पंजाब कोट्यातून आम आदमी पार्टी (AAP) क्रिकेटपटू हरभजन सिंग, राघव चढ्ढा, डॉ. संदीप पाठक, अशोक मित्तल आणि संजीव अरोरा यांना राज्यसभेवर पाठवणार आहेत.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हरभजन सिंगचे नाव चर्चेत होते. अशा स्थितीत पक्षाकडून यावरील चिंता आज संपुष्टात आली आहे. वास्तविक, पंजाबमधील ७ पैकी ५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ९ एप्रिल रोजी संपत आहे. यावेळच्या पंजाब विधानसभेच्या (Legislative Assembly) निवडणुकीत आम आदमी पक्षाने ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत राज्यातील राज्यसभेच्या ७ पैकी ६ जागा 'आप'च्या खात्यात जातील, असे मानले जात आहे. सुखदेव सिंग, प्रताप सिंग बाजवा, श्वेत मलिक, नरेश गुजराल आणि शमशेर सिंग दुल्लो हे ५ राज्यसभा सदस्यांपैकी आहेत. ज्यांचा कार्यकाळ पंजाबमध्ये एप्रिलमध्ये संपत आहे.

हे देखील पहा-

AAP चे उमेदवार जाणून घ्या

तसेच 'आप'ने लव्हली विद्यापीठाचे (University) कुलपती अशोक कुमार मित्तल यांचे नाव फायनल केले आहे. अशोक मित्तल हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. अशोक मित्तल हे शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. एका सामान्य कुटुंबातून आलेले, अशोक मित्तल यांनी समाज आणि पंजाबची सेवा करण्यासाठी LPU ची स्थापना केली होती आणि स्वतःच्या बळावर यश मिळवले होते. त्याचवेळी पाचवे उमेदवार म्हणून संजीव अरोरा यांचे नाव पुढे आले आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंगबद्दल (Harbhajan Singh) सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर राघव चढ्ढा हा देखील दिल्लीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. ते जल बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी राघव चढ्ढा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करायचे. राघवला बिनदिक्कत मत व्यक्त करण्यासाठी बाहेर जावं लागतं. राघव चढ्ढा सध्या दिल्ली (Delhi) विधानसभेच्या राजेंद्र नगर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे राघव चड्डा यांना राज्यसभेवर जाण्यासाठी आपली जागा सोडावी लागणार आहे.

कोण आहे संदीप पाठक?

डॉ. संदीप पाठक हे आयआयटी दिल्लीतील भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. संदीप पाठक यांना बुथ स्तरापर्यंत संघटन करण्यात नैपुण्य आहे. यापूर्वी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत डॉ. संदीप पाठक यांनी आम आदमी पार्टीसाठी काम केले होते. संदीप हा छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी येथील रहिवासी आहे. संदीपचे कुटुंब आजही बाठा गावात राहत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT