अमरावती: हातावर हात देऊन बसले राहीले तर तुमच्या लेकीबाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी केले आहे. वरुड- मोर्शी तालुक्यात गावांमध्ये विविध ठिकाणी भेटी देत असतांना डॉ. बोंडे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी वर्ध्याचे (Wardha) भाजप खासदार रामदास तडस हे देखील उपस्थित होते. आपण धार्मिक आहोत आणि भारत माता की जय म्हणतो असा विचार करून शांत बसणार असेल तर इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब (Hijab) घालणे बंधनकरक आहे, तशीच परिस्थिती पुढच्या ३० वर्षामध्ये आपल्या मुलींवर आली तर नवल वाटून घेऊ नका असे डॉ. बोंडे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
हे देखील पहा-
अमरावती (Amravati) शहरामध्ये १३ नोव्हेंबर दिवशी घडलेल्या घटनेमध्ये आम्ही होतो आणि आमच्या तरुणांनी समर्थपणे ताकद दाखवली होती. जिथे- जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्य केले आहे. त्याठिकाणची मंदिरे (Temples) सुरक्षित राहिली इतर ठिकाणी मात्र, मंदिराच्या बाजूला मस्जिद उभी झाली आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपली मुले मजबूत राहिली पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहन डॉ. बोंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.
यावर बोलत असताना भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड म्हणाले आहे की, अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत आहे. त्यांचे वक्तव्य वादग्रस्त (Controversial) नाही तर विचार करायला लावणारे आहे. सरकार (Government) शिवजयंतीवर निर्बंध लादत आहे. मिरवणुका काढण्यावर निर्बंध लादले जात असणार आहे, तर आमच्या भगिनीवर हिजाब घालण्याची वेळ येईल, असे लाड यावेळी म्हणाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.