वृत्तसंस्था: देशभरात छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj) यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जात आहे. तर तेलंगणामधील (Telangana) निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरामध्ये शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून दोन गटामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी (police) कलम १४४लागू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन शहरामध्ये एका गटाने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पण या पुतळ्याला दुसऱ्या एका गटाने विरोध केला आहे.
हे देखील पहा-
यामुळे दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आहे. काही वेळानंतर या गटाने जोरदार गोंधळ घातला आणि दगडफेक (Stone throwing) केले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा देखील केला आहे. या धुमश्चक्रीमध्ये पोलीस कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे. निजामाबाद पोलीस आयुक्त नागराजू यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम १४४ लागू केला आहे. परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे (BJP) नेते धर्मपुरी अरविंद यांनी ट्वीट करून, बोधन जिल्हा परिषदेने शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यास परवानगी दिली होती. पण तरी देखील टीआरएस- एमआएएमच्या (MIM) गुंडांची गोंधळ घातला आहे. आता सत्ताधारी टीआरएसच्या नेत्यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून खुलेआम धमकी देत आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी फोनवर पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या शहरामध्ये परिस्थिती नियमंत्रणात आहे. शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.