pakistan cricket team twitter
क्रीडा

Ahmad Shahzad: पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूने लायकीच काढली, VIDEO शेअर करत म्हणाला...

Ankush Dhavre

Ahmad Shahzad On Pakistan Performance against Bangladesh: बांगलादेशने पाकिस्तानमध्ये खेळताना इतिहास रचला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही मालिकांमध्ये शानदार कामगिरी करत बांगलादेशने यजमान पाकिस्तानचा २-० ने धुव्वा उडवला आहे.

या मालिका विजयानंतर बांगलादेशवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय, तर पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शहजादने आपल्या संघाची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

अहमद शहजादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणाला की, 'बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून सुपडा साफ केलाय. तुम्हाला येतच नाही, तुमच्याकडून काहीच होत नाही. काय म्हणायचं आता तुम्हाला. त्यांनी तुमच्या देशात येऊन सराव केला.'

बांगलादेशचं केलं कौतुक

या दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेशने शानदार क्रिकेट खेळून दाखवल. त्यामुळे बांगलादेशचं कौतुक करत तो म्हणाला की, ' बांगलादेशने काय क्रिकेट खेळलं आहे. काय बॉलिंग केलीय, काय बॅटींग केलीय. कसोटी क्रिकेट कसं खेळायचं हे त्यांच्या फलंदाजांनी दाखवून दिलं. तसेच अनुशासनाने कशी गोलंदाजी करायची हे त्यांच्या गोलंदाजांनी दाखवून दिलं. तुम्ही तर खेळपट्टी अशी असावी, तशी असावी अशा टीका करत बसले. ज्यावेळी बांगलादेशचे फलंदाज बॅटींग करत होते, त्यावेळी असं वाटत होतं की, विकेट फ्लॅट आहे.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला अवघ्या २७४ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सईम अयुबने ५८ धावांची, तर शान मसुदने ५७ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव २६२ धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानला दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानचा डाव १७२ धावांवर आटोपला. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या होत्या. हे आव्हान बांगलादेशने ६ गडी राखून पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT