rahul dravid | राहुल द्रविड SaamTv
Sports

राहुल द्रविडच्या 'त्या' प्लानवर टीम इंडियाचा माजी कर्णधार भडकला

भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी राहुल द्रविडवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून पहिल्याच सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. भारताने वेस्ट इंडिजचा ६८ धावांनी पराभव केला. १९ चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांची फटकेबाजी करत ४१ धावा कुटणाऱ्या दिनेश कार्तिकला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. परंतु, भारताने विजय संपादित केल्यानंतरही भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी अप्रतिम फॉर्मात असणाऱ्या दीपक हुड्डाला (Deepak hooda) संधी दिली नाही. त्याच्या जागेवर श्रेयस अय्यरवर प्लेईंग ११ मध्ये घेण्यात आलं. या निर्णयामुळं श्रीकांत राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर भडकले आहेत.

टीम इंडियाचे माजी कर्णधार श्रीकांत आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझा यांनी ब्रॉडकास्टर फॅन कोडशी संवाद साधला. यावेळी श्रीकांत म्हणाले, हुड्डा कुठे आहे ? हुड्डा टी -२० आणि वनडेतही एक चांगला खेळाडू आहे. हुड्डासारखा खेळाडू संघात असला पाहिजे. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत. संघात अष्टपैलू खेळाडूंची अत्यंत आवश्यकता असते. जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं आहे.

यावर बोलताना ओझाने म्हटलं, जर एखादा खेळाडू पहिल्यांदा तुमच्यासाठी खेळत असेल तर त्याला सहकार्य करा. त्यानंतर दुसऱ्या विकल्पाकाचा विचार करा, असं राहुल द्रविड यांना वाटतं. त्यानंतर श्रीकांतन यांनी ओझाच्या विधानाचं खंडन करत म्हटलं, राहुल द्रविडचे विचार आम्हाला नको आहेत, आता तुमचे विचार मांडा. त्यानंतर ओझाने प्रतिक्रिया देत म्हटलं, नक्कीच, हुड्डा तर असलाच पाहिजे.

दीपक हुड्डाची शतकी खेळी

वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दीपक हुड्डाला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. या सामन्यात श्रेयस अय्यरने चार चेंडूत एकही धाव काढली नाही, तो शून्यावर बाद झाला. यावर्षी दीपकने आतापर्यंत खेळलेल्या चार टी-२० सामन्यांमध्ये ६८.३३ च्या सरासरीनं २०५ धावा केल्या आहेत. यामध्ये एक दमदार शतकी खेळीचाही समावेश आहे. तर श्रेयस अय्यरने यंदा दहा टी-२० सामन्यांमध्ये तीन अर्थशतकांच्या जोरावर ३५१ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT