Glenn Mcgrath Prediction For World Cup: भारतात यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भारतात रंगणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमध्ये रंगणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला २ महिन्यांपेक्षाही कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडू आपली मतं मांडताना दिसून येत आहे.
नुकताच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्राने कोणते ४ संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील याबाबत भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्लेन मॅकग्रा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासह, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात. ग्लेन मॅकग्रा बद्दल बोलायचं झालं तर, वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे.
ग्लेन मॅकग्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' तुम्हाला मुळीच आश्चर्य व्हायला नको, मी सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश करत आहे. भारतीय संघ मायदेशात खेळणार आहे.
त्यामुळे भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर इंग्लंड आणि पाकिस्तानने देखील गेल्या काही वर्षात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हे ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात. (Latest sports updates)
या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर मालिकेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.