Shapoor Zadran Death 
Sports

Cricket News : क्रीडा विश्वावर शोककळा! दिग्गज खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

Shapoor Zadran Death News : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान यांचे वयाच्या ३९व्या वर्षी दीर्घ आजाराने भारतात निधन झाले. एचएलएच आजाराशी झुंज देत असलेल्या झद्रान यांच्या निधनाबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला.

Namdeo Kumbhar

Shapoor Zadran Dies : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान याचं दीर्घ आजाराने भारतात निधन झाले. ३९ व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच शापूर झद्रानचे निधन झाले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शापूरच्या निधनाबाबतची माहिती दिली. अफगान क्रिकेट बोर्डाने माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. झद्रानला 'हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसिस' (HLH) या रोगप्रतिकारशक्तीच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ लागले होते. काही रिपोर्ट्सनुसार शापूर झद्रान गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली-एनसीआर परिसरात उपचार घेत होता.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने काय म्हटले?

झाद्रान गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आजारी पडला होता. त्यानंतर अफगाण डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी भारतात दाखल होण्याता सल्ला दिला. सुरुवातीला उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पण २० दिवसांनंतर त्याची प्रकृती पुन्हा खालावली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर झाद्रान यांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हटले की, शापूर झाद्रान यांचे योगदान आणि कर्तृत्व हे अफगाण क्रिकेटच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग राहील.

शापूरने अफगाणिस्तानसाठी टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळले

झाद्रान अफगाणिस्तानचा प्रतिभावंत वेगवान गोलंदाज होता. तो अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळला. विश्वचषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक होता. त्याच्यामुळेच अफगाणिस्तानचा संघ आज जगातील सर्वात बलाढ्य संघांचा स्पर्धा करत आहे.

शापूरची कामगिरी कशी होती?

शापूर झद्रानने अफगाणिस्तानसाठी ४४ एकदिवसीय आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४४ सामन्यांत ४३ बळी घेतले. तसेच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३७ बळी घेतले. झद्रानने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये १७ बळी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५६ बळी घेतले. झद्रान अफगाणिस्तानसाठी शेवटचा १० मार्च २०१९ रोजी डेहराडून येथे आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत खेळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मिळत नसल्याने शिक्षक आक्रमक! सरकारला दिला थेट इशारा, आता काय होणार?

SCROLL FOR NEXT