Sports

IND vs ENG : ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने केले 'हे' पाच मोठे विक्रम

९० वर्षांच्या इतिहासात भारताने पाच विक्रमांना गवसणी घालण्याची चमकदार कामगिरी केली आहे.

नरेश शेंडे

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वात भारत इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळत आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पाच मोठ्या विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने (Indian Cricket Team) दुसऱ्या इनिंगमध्ये ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ४१६ धावा कुटल्या होत्या. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) शतकी खेळीमुळं भारताला मोठी धावसंख्या करता आली. त्यानंतर इंग्लंडची इनिंग सुरु झाल्यावर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) शतक ठोकले. त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या २८४ वर पोहोचली. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यात (Five Big Records) भारताने पाच मोठे विक्रम केले. ९० वर्षांच्या इतिहासात भारताकडून विक्रम करण्याची उत्तम कामगिरी झाली आहे.

भारताने केले पाच मोठे विक्रम

पहिला : पहिल्या इनिंगमध्ये रिषभ पंतने १४६ आणि रविंद्र जडेजाने १०४ धावा केल्या. यापूर्वी या मैदानावर एका सामन्यात कधीही भारताच्या खेळाडूंनी दोन शतक केले नाही. खेळाडू म्हणून विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरने या सामन्याआधी शतकी खेळी केली होती.

दुसरा : पंत आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागिदारी केली. सहाव्या विकेटसाठी भारताने केलेली भागिदारी इंग्लंडमध्ये सर्वात मोठी भागिदारी आहे. याआधी पंत आणि राहुलने २०१८ मध्ये ओवलच्या मैदानात २०४ धावांची जबरदस्त भागिदारी केली होती.

तिसरा : भारताचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात वैयक्तीक २९ धावा केल्या. बुमराहने ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. हा टेस्टमधील एका षटकातील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम आहे. याआधी ब्रायन लाराने एका षटकात वैयक्तीक २८ धावा केल्या होत्या.

चौथा : बुमराहने एजबेस्टन मध्ये पहिल्या इनिंगसाठी १० व्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद ३१ धावा कुटल्या. या मैदानावर १० व्या नंबरवर आलेल्या भारताच्या खेळाडूचा सर्वाधिक स्कोर आहे.

पाचवा : इंग्लंडच्या पहिल्या इनिंग मध्ये भारताच्या गोलंदाजांनी १० विकेट्स घेतल्या. पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत ७१ विकेट्स घेतल्या आहेत. ही द्विपक्षीय सीरिजमध्ये त्यांची चमकदार कामगिरी आहे. याआधी वेगवान गोलंदाजांना कधीही ६१ पेक्षा जास्त विकेट मिळाल्या नव्हत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT