क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, 5 चेंडूंचे षटक तर...! Twitter
Sports

क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, 5 चेंडूंचे षटक तर...!

क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच (Cricket History) एक अद्धूत सामना खेळला गेला आहे. हा अद्भूत सामना एका स्पर्धेत खेळला गेला.

वृत्तसंस्था

क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच (Cricket History) एक अद्धूत सामना खेळला गेला आहे. हा अद्भूत सामना एका स्पर्धेत खेळला गेला. या स्पर्धेचे नाव आहे 'द हंड्रेड' (The Hundred Tournament) त्यात १०० चेंडूचा सामन खेळला गेला आहे. या स्पर्धेत एका षटकात ६ चेंडू टाकण्याचा नियम काढून टाकण्यात आला होता. एक गोलंदाज एका षटकात एक तर ५ चेंडू टाकू शकतो किंवा १० चेंडू टाकू शकतो. या स्पर्धेत ५ चेंडूचे एक षटक समजले जाईल त्याला 'फाईव' म्हटले गेले. या नविन नियमानूसार क्रिक्रेट इतिहासातला पहिला १०० चेंडूंची सामना खेळला गेला. हा सामना ओव्हल इनव्हिजीबल (Oval Invincibles Women) आणि मँचेस्टर ऑरजिनल्स वुमेन (Manchester Originals Women) यांच्यात खेळला गेला आहे.

या सामन्यात मँचेस्टर ऑरजिनल्स वुमेन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १०० चेंडूमध्ये मँचेस्टर ओरजिनल्स वुमेन संघने ६ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या. मँचेस्टर कडून खेळताना लिजेल ली ने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या, ज्यात ८ चैकारांचा समावेश होता. भारतीय फलंदाज हरमनप्रित कौरने तिचा संभाव्या खेळ करत तूफानी १६ चेंडूत २९ धावा बनवल्या, ज्यात ६ चैकारांचा समावेश होता. ओवलकडून ताश फॅरेंटने २० चेंडूत ३ बळी घेतले तर मरिजाने कॅपने २ बळी घेतले.

त्याचबरोबर 100 चेंडूच्या या सामन्यात 136 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ओव्हल महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु या संघाने हे लक्ष्य 98 चेंडूमध्ये 5 गडी शिल्लक असताना पुर्ण केले. ओव्हलसाठी कर्णधार डॅन व्हॅन निकेरकने 42 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या तर मारिजणे कॅपने 27 चेंडूत 38 धावा केल्या. मॅडी विलियर्सने 16 धावा केल्या. त्याचवेळी जॉर्जिया अ‍ॅडम्सने 12 धावा केल्या. मॅनचेस्टरकडून कर्णधार कॅट क्रॉसने 3 गडी बाद केले, तर सोफी इक्लेस्टोन आणि लॉरा जॅक्सनने 1-1 अशी बळी घेतला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT