Bursaspor vs Amedspor
Bursaspor vs Amedspor  Saatm TV
क्रीडा | IPL

VIDEO : खेळाडूंवर फटाके, बाटल्या, चाकू फेकले; लाईव्ह मॅचदरम्यान मोठा गोंधळ, पाहा व्हिडीओ

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : फुटबॉल जगभरातील लोकप्रिय खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात या खेळाचा चाहतावर्ग आहे. फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंच्या वादाच्या अनेक घटना तुम्ही पाहल्या असतील.

मात्र मैदानात फुटबॉल खेळाडूंवर प्रेक्षकांची फटाके आणि चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Bursaspor vs Amedspor यांच्यातील लाईव्ह मॅचदरम्यान मैदानातील दृष्य भयानक आहे.

हे दोन्ही संघ सामन्यापूर्वी वॉर्मअप करत असताना Amedspor खेळाडूंवर प्रेक्षकांनी चाकू, फटाके आणि बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. यादरम्यान, संपूर्ण सामन्यादरम्यान चाहते अँटी कुर्दीश गाणीही गाताना दिसले.

सरावाच्या वेळी खेळाडूंवरील चाहत्यांचा रोष सामन्यादरम्यानही कायम होता. हा खेळ ९० मिनिटे चालला आणि यादरम्यान चाहत्यांचा राग खेळाडूंवर दिसत होता. खेळाडूंवर प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या. सामन्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतरही हा तमाशा सुरूच होता.

खेळाडूंवर फेकलेला चाकू मैदानात दिसून आला. अॅमेडस्पोरच्या टीमने या संपूर्ण घटनेची तक्रार केली. ड्रेसिंग रुममध्ये खाजगी सुरक्षा सुपरव्हायझर, क्लब सुरक्षा अधिकारी, क्लब कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडूनही छळ करण्यात आल्याचा दावा खेळाडूंनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर तुर्की फुटबॉल महासंघाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. Amedspor गेल्या काही वर्षांपासून तुर्कीमध्ये वादात सापडले आहे. याचे कारण त्याचे बदललेले नाव आहे, जे कुर्दिश शहर अमेदवर आधारित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT