india won against france in fih pro league hockey saam tv
क्रीडा

FIH Pro League: टीम इंडियानं फ्रान्सचा केला दणदणीत पराभव; आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

भारताचा दुसरा सामना आज (बुधवार) यजमान दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने FIH प्रो लीग हॉकीच्या (FIH Pro League Hockey) पहिल्या सामन्यात फ्रान्सचा ५-० असा धुव्वा उडविला. खेळाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाने (team india) संयमी खेळ केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात अनुक्रमे तीन आणि दोन गोल नाेंदवत फ्रान्सला (france) हरवलं. या सामन्यात भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी संघास दोनच गोल करता आले.

या (hockey) सामन्यात फ्रान्सला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र संघास एकही गाेल करताना आला नाही. भारताच्या हरमनप्रीत सिंग आणि वरुण कुमार यांनी अनुक्रमे २१व्या आणि २४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. तर 28व्या मिनिटाला समशेर सिंगने मैदानी गोल करून ३-० अशी दुस-या सत्रात फ्रान्सवर आघाडी घेतली. टोकियो गेम्समध्ये ४१ वर्षांनंतर ऐतिहासिक ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी मनदीप सिंग (३२वे) आणि आकाशदीप सिंग (४१वे) यांनीही गोल या सामन्यात गाेल नाेंदविले.

भारतीय (india) संघाचा हा वर्षातील पहिला सामना हाेता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला पहिल्या १५ मिनिटांच्या क्वार्टरमध्ये सेट होण्यासाठी थोडा वेळ लागला. पण एकदा प्रतिस्पर्ध्याच्या कमकुवतपणाची जाणीव झाल्यावर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने आघाडी घेतली आणि फ्रान्सचा पराभव केला.

भारताचा दुसरा सामना आज (बुधवार) यजमान दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनूसार रात्री साडे नऊला सुरु हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT