Kylian Mbappe Saamtv
क्रीडा

Kylian Mbappe: दंगलीत बालपण गेले, घरही उध्वस्त झाले, तरीही लढला; अर्जेंटिनाला घाम फोडणाऱ्या एम्बाप्पेचा संघर्षमय प्रवास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FIFA WC Final : शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली आणि इतिहास रचला. या विजयासोबतच तब्बल ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकावर नाव कोरले. मात्र अर्जेंटिनाच्या विजयापेक्षा चर्चा झाली ती फ्रान्सच्या एम्बाप्पेची. या सामन्यात एम्बाप्पेने जिगरबाज खेळ करत अर्जेंटिनाला जेरीस आणले. त्यामुळेच पराभवानंतरही एम्बाप्पेच्या खेळीचे कौतुक होत आहे.

आपल्या चमकदार खेळीने चर्चेत आलेल्या एम्बाप्पेने वयाच्या २३ व्या वर्षी आपल्या खेळीने फुटबॉल जगताला थक्क केले आहे. सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या या खेळाडूचे बालपण मात्र अत्यंत हालाखीत गेले. परंतु जिद्दीने परिस्थितीवर मात करत एम्बाप्पेने यशाचे शिखर गाठले. पाहूया या जिगरबाज खेळाडूचा जिवनप्रवास.

एम्बाप्पेचा जन्म पॅरिसमध्ये (Paris) 20 डिसेंबर 1998 रोजी झाला आणि पॅरिसपासून 10 किमी अंतरावर असलेल्या बोंडी येथे मोठा झाला. हे तेच शहर आहे, जे एकेकाळी हिंसाचार आणि दंगलीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. 2005 मध्ये बोंडअळीच्या हिंसाचारात अनेक घरे जाळली गेली. हे शहर जवळपास पेटले होते आणि एम्बाप्पेच्या आई-वडिलांचे घरही त्याच भागात होते.

बालपणी हिंसाचार आणि रक्तपात बघून एमबाप्पे नक्कीच हादरला होता, पण तो आपल्या ध्येयापासून भरकटला नाही आणि वडिलांमुळे तो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. त्याचे वडील विल्फ्रेड हे फुटबॉल प्रशिक्षक होते.

एम्बाप्पेच्या वडिलांनीच उशीऐवजी फुटबॉलवर डोके ठेवून झोपणाऱ्या आपल्या मुलाला सुपरस्टार बनवण्याचा निश्चय केला. त्यासाठी दोघांनीही सतत मेहनत घेतली. त्या मेहनतीचे फळ म्हणजे आज जगातील प्रत्येक डिफेंडर आणि गोलकीपर एम्बाप्पेजवळ चेंडू येताच थरथर कापतो.

दरम्यान, एम्बाप्पेने फिफा (FIFA) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोलची हॅट्रिक लगावत अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल करत गोल्डन बूटही या 23 वर्षीय खेळाडूने मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT