FIFA World Cup 2022 Wales vs Iran/Fifa-Twitter
FIFA World Cup 2022 Wales vs Iran/Fifa-Twitter SAAM TV
क्रीडा | IPL

FIFA World Cup 2022 : 'फिफा'मध्ये हायव्होल्टेज 'तडका', अखेरच्या क्षणी २ गोल डागून इराणनं सगळ्यांनाच केलं हैराण

Nandkumar Joshi

FIFA World Cup 2022, Wales Vs Iran : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील रोमांच दिवसागणिक वाढत आहे. सहाव्या दिवशीच्या पहिल्याच सामन्यात रोमांच पाहायला मिळाला. वेल्स आणि इराण यांच्यात पहिला सामना झाला. या रोमहर्षक लढतीत इराणनं अखेरच्या क्षणी दोन गोल डागून विजय मिळवला. या विजयासह इराणच्या सुपर १६ मध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत.

वेल्स आणि इराण यांच्यात ग्रुप बी मधली लढत होती. इराणनं २-० अशा गोलफरकाने विजय मिळवला. दोन्ही संघ या स्पर्धेतील दुसरा सामना खेळत होते. वेल्स संघानं या स्पर्धेतील पहिला सामना अनिर्णित ठेवला होता. त्यांचा पहिला सामना हा अमेरिकेसोबत झाला होता. तो १-१ अशा बरोबरीत सुटला. (Football)

तर इराणनं पहिल्याच लढतीत धक्कादायक पराभवाचा सामना केला होता. त्यांचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध झाला होता. त्यात ६-२ ने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळं हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं.

वेल्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित ९० मिनिटांपर्यंत गोल झाला नव्हता. हा सामना अनिर्णित राहील, असं वाटत होतं. मात्र, अधिकचा वेळ मिळाला आणि इराणनं संधी साधली. इराणनं दोन गोल डागून सामन्याचा निकालच बदलला. या विजयासह तीन गुण इराणनं मिळवले आहेत. सुपर १६ मध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. (FIFA World Cup)

एक्स्ट्रा टाइम अन् इराणनं वेल्सचा केला गेम

सामन्याच्या निर्धारित ९० मिनिटांमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल होऊ शकला नव्हता. त्यानंतर ज्यादा वेळ देण्यात आला. या अधिकच्या वेळेत इराणचे खेळाडू अधिक आक्रमक झाले. त्यांनी ही वेळ अचूक साधली. इराणकडून पहिला गोल रौजबेह चेश्मी यानं ९० प्लस आठव्या मिनिटाला केला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी रामिन रेजएइयन यानं गोल डागून २-० असा विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT