FIFA Saam TV
Sports

FIFA World Cup Prize Money: सर्वच संघांवर होणार पैशाचा पाऊस, बक्षिसांबाबत क्रिकेट जवळपासही नाही

फूटबॉल-क्रिकेट दोन्ही विश्वचषकांच्या चॅम्पियन संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत अनेक पटींचा फरक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FIFA World Cup Prize Money: T20 विश्वचषक संपल्यानंतर आता फुटबॉल विश्वचषकाला उद्यापासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कतारमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होत आहेत. त्यात आशिया खंडातील 6 संघ आहेत. (FIFA World Cup)

T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन आणि उपविजेत्या संघांसह इतर सर्व संघांना बक्षीस रक्कम वितरित करण्यात आली आहे. पण फिफा विश्वचषकात आता जेतेपद आणि बक्षिसाच्या रकमेची चर्चा सुरु झाली आहे.  (Sports News)

क्रिकेट आणि फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या दोन्ही संघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. दोन्ही विश्वचषकांच्या चॅम्पियन संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत अनेक पटींचा फरक आहे.

ICCने T20 विश्वचषकासाठी एकूण 56 लाख डॉलर म्हणजेच 45.14 कोटींची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी सर्व 16 संघांमध्ये वेगवेगळी वाटली गेली. अंतिम फेरीच्या चॅम्पियन संघाला सुमारे 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला सुमारे 6.44 कोटी रुपये मिळाले.

FIFA विश्वचषक स्पर्धेत बक्षीस म्हणून 3585 कोटी मिळणार

फिफा विश्वचषकाची बक्षिसाची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे. ही बक्षीस रक्कम 44 कोटी डॉलर म्हमजे सुमारे 3585 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला 4.2 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 342 कोटी रुपये मिळतील. मागील 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 40 लाख डॉलर्स जास्त आहे.

क्रिकट आणि फूटबॉल विजेत्यांना मिळणारी रक्कम

>> ICC T20 विश्वचषक 2022 जिंकणाऱ्या संघाला सुमारे 13 कोटी रुपये मिळाले.

>> FIFA विश्वचषक 2022 जिंकणाऱ्या संघाला सुमारे 342 कोटी रुपये मिळतील.

>> आयपीएल 2022 चा हंगाम जिंकणाऱ्या संघाला सुमारे 20 कोटी रुपये मिळाले.

>> फिफा विश्वचषक स्पर्धेत 3585 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT