fifa u-17 womens world cup, goa, navi mumbai, Bhubaneswar, football. saam tv
क्रीडा

FIFA U-17 Women's World Cup 2022 : फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबईत रंगणार अंतिम सामना

नवी मुंबईत सर्व सहभागी राष्ट्रांना येत्या २४ जून रोजी अधिकृत ड्रॉ समजणार आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : युवा फुटबाॅलप्रेमींना (football) वेध लागलेल्या सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे (FIFA U-17 womens world cup) वेळापत्रक आज (बुधवारी) फिफा (FIFA) आणि स्थानिक आयोजन समितीने (LOC) जाहीर केले आहे. भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे 11 ऑक्टोबरपासून भारताच्या गटातील सामन्यांना (fifa world cup) प्रारंभ हाेणार. तसेच गोव्यात (Goa) दोन्ही उपांत्य फेरीचे सामने हाेणार आहेत. दरम्यान नवी मुंबईत (Navi Mumbai) 30 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना हाेईल असे सांगण्यात आले आहे. (fifa u-17 womens world cup marathi news)

या स्पर्धेतील गटातील सामने हे 18 ऑक्टोबर रोजी संपतील. हे सामने ओरिसा (odisha), गोवा आणि महाराष्ट्र (maharashtra) या यजमान राज्यांत हाेतील. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे (quarter final) सामने 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी होतील. त्यानंतर 26 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे (semi final) सामने होतील.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये (Kalinga Stadium) 11, 14 आणि 17 ऑक्टोबरला यजमान भारताच्या गटतील सामने हाेतील. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम (DY Patil Stadium) आणि फातोर्डा (गोवा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम (Pandit Jawaharlal Nehru Stadium Fatorda, Goa) येथे उपांत्यपूर्व फेरीच्या लढती घेतल्या जाणार आहेत.

स्थानिक आयाेजन समितीचे अंकुश अरोरा आणि नंदिनी अरोरा यांनी एका संयुक्त निवेदनात महिलांच्या उन्नतीसाठी आणि फुटबॉलचा प्रचार व प्रसार वाढवा यासाठी फिफाने दिलेल्या प्राेत्साहनाबद्दल फिफाचे आभार मानले आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्याने हा ऐतिहासिक स्पर्धेचा एक महत्त्वाचा क्षण असून भारताच्या दुसऱ्या फिफा स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी प्रगतीपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

French Fries Recipe: घरच्याघरी बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत अन् टेस्टी फ्रेंच फ्राइज

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

SCROLL FOR NEXT