भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सरावाला सुरूवात केली आहे. कर्नाटकच्या अलुरमध्ये भारतीय संघाचे सराव शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंची यो-यो टेस्ट करण्यात आली.
ज्यात कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविद्रं जडेजासारख्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
माध्यमातील वृ्त्तानूसार सर्व खेळाडूंनी यो-यो टेस्ट पूर्ण केली आहे. मात्र रोहित शर्माच्या फिटनेस टेस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रोहितची यो-यो टेस्ट सर्वांसमोर करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित का?
आशिया चषक तोंडावर असताना भारतीय खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली आहे. मात्र रोहितच्या यो-यो टेस्टचा अहवाल खोटा आहे, असं का म्हटलं जात आहे? रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी देखील अनेकदा त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. आतापर्यंत त्याने सर्व फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पुर्ण केल्या आहेत.
विराटने केली ही चुक...
एकीकडे रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे विराटने एक मोठी चुक केली आहे. त्याने आपला यो-यो टेस्टचा स्कोर आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे.
एका सुत्राने दिलेल्या माहितीनूसार बीसीसीआयला हे मुळीच आवडलेलं नाही. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना आपल्या यो-यो टेस्टचा स्कोर सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest sports updates)
या खेळाडूंना यो-यो टेस्ट देण्याची गरज नाही...
जे खेळाडू आयर्लंड दौऱ्यावर नव्हते त्या खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली आहे. या कारणास्तव जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची यो-यो टेस्ट केली जाणार नाही.
आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या संघातील ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तर संजू सॅमसनची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.