Faf du plessis statement after defeat against kolkata knight riders reveals the turning point of the match amd2000 twitter
Sports

Faf Du Plessis Statement: RCBचं नेमकं चुकलं तरी कुठं? सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितला टर्निंग पॉईंट

KKR vs RCB, IPL 2024: या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामन्यातील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. २२३ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २२१ धावांपर्यंत मजल मारता आली. हातातून निसटलेला सामना कर्ण शर्माने ३ षटकार खेचून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या दिशेने खेचून आणला. मात्र तो बाद झाल्यानंतर सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या दिशेने फिरला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा हा ८ पैकी सातवा पराभव आहे. या संघाला केवळ पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या परभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. दरम्यान सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने या सामन्यातील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

सामना झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस म्हणाला की, ' हा खूप रोमांचक असा सामना होता. माझ्यासाठी सुनील नरेनचं षटक टर्निंग पॉईंट होतं. हा खेळ पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे तुम्ही फलंदाजीला आल्यानंतर सेट होण्यासाठी ७-८ चेंडू घेऊ शकत नाही. तुम्हाला पावरप्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल आणि विकेट्स गेल्या तरी खंबीर उभं राहावं लागेल. मला अभिमान वाटतोय, आम्ही कडवी झुंज दिली.'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा पराभव..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतानात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २२२ धावा केल्या. या धावांचाा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २२१ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात कर्ण शर्माने तुफान फटकेबाजी करत स्टार्कच्या षटकात ३ षटकार खेचले. रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र शेवटच्या चेंडूवर हा सामना गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

SCROLL FOR NEXT