Water for weight loss: बॅलन्स डाएटसोबत प्या 'या' मसाल्याचं पाणी, वजन होईल झटक्यात कमी

Surabhi Jayashree Jagdish

वजन नियंत्रण

जिरं हा आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा मसाला आहे. भाज्या, आमटी आणि इतर पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. संतुलित आहारासोबत जिऱ्याचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.

जिऱ्याचं पाणी

जिऱ्याचा आहारात समावेश करण्यासाठी जिऱ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता. यासाठी जिरं पाण्यात भिजवून किंवा उकळून त्याचे पाणी तयार केले जाते. हे पाणी कोमट असताना घेता येते.

पचनासाठी जिरे फायदेशीर

जिऱ्याचा वापर अनेक वर्षांपासून पचनासाठी केला जातो. जेवणानंतर पोट जड होणे किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवत असेल, तर आहारात जिऱ्याचा वापर केला जातो. पचन व्यवस्थित राहिल्यास रोजची दिनचर्याही चांगली राहण्यास मदत होते.

रक्तातील साखरेसाठीही जिऱ्याचा वापर

जिऱ्याचा वापर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी केवळ जिऱ्यावर अवलंबून राहू नये. मधुमेह असल्यास डॉक्टरांनी सांगितलेला आहार, औषधे आणि व्यायाम नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे.

शरीरासाठीही जिऱ्याचे फायदे

जिऱ्यामध्ये काही उपयुक्त घटक असतात. त्यामुळे रोजच्या संतुलित आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने शरीराला पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फक्त जिरं खाणं पुरेसं नाही.

जिऱ्यामधील घटक

काही अभ्यासांनुसार, जिऱ्यामध्ये असे घटक असतात. ज्यांचा काही जिवाणू आणि बुरशीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जिरे केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर पारंपरिक पद्धतीने आरोग्यासाठीही वापरलं जातं.

वजन कमी होत नाही

वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी हा एकमेव उपाय नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी संपूर्ण आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबी यांचा समावेश करावा.

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion
येथे क्लिक करा