Ravi shastri Ajit Agarkar x
Sports

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Viral Post : अजित आगरकर हे सध्या बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या जागी रवी शास्त्री यांची अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • रवी शास्त्री यांची निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली.

  • या पोस्टमध्ये अजित आगरकर यांना पदावरून हटवले जाणार असल्याचा दावा करण्यात आला.

  • खरचं अजित आगरकर यांना हटवून रवी शास्त्री यांची अध्यक्षपदी निवड होणार आहे का?

Ajit Agarkar Ravi Shastri : अजित आगरकर हे सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख आहेत. निवड समितीवर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी घेतलेले बरेचसे निर्णय चाहत्यांच्या पसंतीस पडलेले नाहीयेत. आगरकर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत मिळून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचेही अनेकांचे मत आहे. भारतीय संघाच्या निवडीबाबत घेतलेल्या निर्णयांवरून आगरकर यांच्यांवर टीका देखील होते आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्त्वात निवड समितीचे निर्णय -

  • चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे अशा अनुभवी खेळाडूंऐवजी नव्या खेळाडूंना संधी देणे

  • कसोटी क्रिकेटमधून आर. अश्विन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची निवृत्ती.

  • कसोटीनंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवणे.

अजित आगरकर यांच्या निर्णयांमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याच्या त्यांच्या निर्णयानंतर रोहित-विराट यांना दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधूनही माघार घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या एकूण परिस्थितीला गंभीरसह अजित आगरकर देखील जबाबदार असल्याचे काहीजण म्हणत आहेत.

यादरम्यान अजित आगरकरच्या संबंधित एक्स पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. या पोस्टमध्ये 'अजित आगरकर यांच्या जागी भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नियुक्ती होणार आहे', लिहिले आहे. टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार अभिषेक मल्होत्रा यांच्या नावाचा उल्लेख देखील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण ही गोष्ट खरी आहे का?

व्हायरल होणारी एक्स पोस्ट ही खोटी आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय किंवा चर्चाही सुरु नाहीये. अजित आगरकर हेच भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. २०२६ पर्यंत आगरकर यांचा बीसीसीआयसोबत करार आहे. काही दिवसांपूर्वी समितीत दोन बदल झाले होते. आर पी सिंह आणि प्रग्यान ओझा यांना निवड समितीमध्ये सामील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे शासकीय इतमामांत करण्यात आले अंत्यसंस्कार

Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

IND vs AUS : वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

७ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, महागडी घड्याळं... DIG च्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ट्रकला लागली भीषण आग! पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT