Explainer hardik pandya performance in ipl 2024 as captain and all rounder amd2000 twitter
Sports

Hardik Pandya: हार्दिक कॅप्टन म्हणून फ्लॉप; तर ऑलराऊंडर म्हणून सुपर फ्लॉप! वाचा काय सांगतेय आकडेवारी

Hardik Pandya Performance In IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान कशी राहिलीये हार्दिक पंड्याची कामगिरी जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२२ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेतलं आणि संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील दिली. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत त्याने पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून दिलं. तर दुसऱ्या हंगामात या संघाने फायनल गाठली. दोन्ही हंगामात हार्दिक पंड्या चमकला. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. या संघाला देखील रोहित शर्माच्या उत्तराधिकाऱ्याची गरज होती. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत १५ कोटींचा ट्रेड केला आणि हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं. (Hardik Pandya Performance)

हार्दिकची कर्णधार म्हणून नियुक्ती...

हार्दिकला संघात घेतल्यानंतर मुंबईच्या फॅन्सच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री झाली होती. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण हार्दिक संघात येताच रोहितला कर्णधारपदावरुन काढण्यात आलं. ही जबाबदारी हार्दिककडे सोपवण्यात आली.

मुंबईने हा निर्णय फ्रँचायझीच्या भविष्याचा विचार करुन घेतल्याचं म्हटलं गेलं. मात्र असा अचानक निर्णय का घेतला? असा सवाल फॅन्सने उपस्थित केला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली. मात्र त्याला अचानक काढल्याने फॅन्स नाराज झाले. याचा परिणाम मुंबईच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पाहायला मिळाला. अवघ्या काही तासातच या संघाला लाखो फॉलोवर्स गमवावे लागले.

बुमराह, सूर्या नाराज...

मुंबई इंडियन्सला रोहित शर्मानंतर उत्तराधिकारी म्हणून कोणीतरी हवा होता. त्यामुळे रोहितनंतर संघाचा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवकडे पाहिलं जात होतं. दोघांनाही या संघाकडून खेळण्याचा बराच अनुभव आहे. दोघांनी भारतीय संघाचं नेतृत्वही केलं आहे. असं असतानाही मुंबई इंडियन्सने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही.

हार्दिकची कर्णधार म्हणून नियुक्ती होताच सूर्यकुमार यादवने हार्ट ब्रेक तर जसप्रीत बुमराहने एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीनंतर हे दोघेही मुंबई इंडियन्सने घेतलेल्या निर्णयावरुन नाराज असल्याचं म्हटलं गेलं होतं. मुंबई इंडियन्स संघात हार्दिक पंड्या विरुद्ध रोहित शर्मा असे २ गट पडले असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली.

पहिल्याच सामन्यात जोरदार बुइंग..

मुंबईचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पार पडला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात एकच खेळाडू जोरदार चर्चेत राहिला तो म्हणजे हार्दिक पंड्या. असं पहिल्यांदाच घडलं असावं की, विरोधी संघातील फॅन्ससह आपल्याच संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले फॅन्सही जोरदार बुइंग करताना दिसून आले. पहिल्यांदाच मुंबईचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या हार्दिकने माजी कर्णधार रोहितची क्षेत्ररक्षण करत असताना इकडून तिकडे,तिकडून इकडे पळवा पळव केली. हे पाहून फॅन्स आणखी चिडले. मुंबईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर हार्दिक पंड्याला जोरदार ट्रोल केलं गेलं.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून एकतर्फी पराभव..

हार्दिक पंड्याची खरी परीक्षा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात होती. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा बाजार उठवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २७७ धावांचा डोंगर उभारला. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध कुठल्याच संघाने इतक्या धावा केल्या नव्हत्या. या सामन्यातही हार्दिकने काही चुका केल्या. ज्यावेळी हैदराबादचे फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते. त्यावेळी जसप्रीत बुमराहने इकॉनॉमीकल गोलंदाजी केली होती. मात्र हार्दिकने त्याला थांबवून ठेवलं. परिणामी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

होम ग्राऊंडवर पराभवाने सुरुवात ..

गुजरात आणि हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर मुंबईचा संघ होम ग्राऊंडवर खेळण्यासाठी मुंबईत परतला. मात्र या सामन्यातही मुंबई इंडियन्सला विजयी सलामी देता आली नाही. हार्दिक टॉस करण्यासाठी आला त्यावेळी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारे फॅन्सही त्याला बुइंग करताना दिसून आले. त्यानंतर दिल्लीला पराभूत करत मुंबईने आपल्या विजयाचं खातं उघडलं. पुढील सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभूत करत आपली स्थिती आणखी मजबूत केली. मात्र घरच्याच मैदानावर मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबईचा कर्णधार म्हणून कामगिरी..

हार्दिक पंड्याने गुजरातचा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी केली. मात्र मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने ८ सामन्यांमध्ये या संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान मुंबईला केवळ ३ सामने जिंकता आहे आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अशी राहिलीये कामगिरी...

जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज संघात असतानाही हार्दिक पंड्या अनेकदा पहिलं षटक टाकताना दिसून आला आहे. मात्र नेतृत्वासह तो गोलंदाजीत आणि फलंदाजीतही पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याची या हंगामातील कामगिरी पाहिली तर त्याने ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना १०.९४ च्या इकॉनॉमीने अवघे ४ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याला २१.५७ च्या सरासरीने अवघ्या १५१ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. त्याला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, त्याला संघात स्थान मिळणं कठीण असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

SCROLL FOR NEXT