England announce squad for first Test vs India x
Sports

भारतासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर, शुभमन गिलचं टेंशन हलकं झालं

England announce squad for first Test vs India : इंग्लंडने भारतविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील १४ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. २० जून रोजी या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. इंग्लंडचे नेतृत्त्व बेन स्टोक्स, तर भारताचे नेतृत्त्व शुभमन गिल करणार आहे.

Yash Shirke

IPL 2025 संपल्यानंतर भारताचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये जाणार आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाने संघ आणि कर्णधाराबाबत घोषणा केली होती. आता इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील १४ जणांचा संघ जाहीर केला आहे. २० जूनपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

बेन स्टोक्सकडे इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद असणार आहे. जेमी ओव्हरटन तीन वर्षांनी इंग्लंडच्या संघात पुनरागमन करणार आहे. त्याने २०२२ मध्ये एकमेव कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. ब्रायडेन कार्स देखील कसोटी संघात परतला आहे. कसोटी मालिकेसाठी जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स यांचीही इंग्लंडच्या संघात निवड झाली आहे. दोघांनीही मागच्या वर्षा डिसेंबरमध्ये इंग्लंडकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

दुखापतीमुळे वोक्स आणि कार्स झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील झाले नव्हते. गेल्या महिन्यात गस अ‍ॅटकिन्सन संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे इंग्लंडचे टेन्शन वाढले आहे. इंग्लंडच्या फलदांजी युनिटचा भार जो रूट, झॅक क्रॉली आणि ऑली पोप यांच्यावर असेल. शोएब बशीर, जेकब बेथेल आणि जेमी स्मिथ यांना संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज सॅम कुकला देखील संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडचा संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रकू, ब्रेडन कार्स, सॅम कूर, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग, ख्रिस वोक्स

भारताचा संघ -

शुभमन गिल ( कर्णधार), रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितिश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

२० जून रोजी भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. हेडिंग्ले, एजबस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड, द किया ओव्हल या पाच स्टेडियम्सवर पाच कसोटी सामने खेळले जातील शेवटचा सामना ३१ जुलै रोजी खेळला जाईल. या सामन्याचा शेवट ४ ऑगस्ट रोजी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT