भारत विरुद्ध इंग्लंड टी२० सीरीजचा पाचवा आणि शेवटच्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात भारताने इंग्लंडला २४८ धावांचं आव्हान दिलं. मात्र, डोंगराएवढं आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ९७ धावांवर ढेपाळला. भारताच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाचव्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकाही जिंकली आहे. भारताने मालिका जिंकल्यानंतर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताने इंग्लंडविरोधात टी२० सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने कब्जा मिळवला. भारताने रविवारी टी-२० सामन्यात इंग्लंडला १५० धावांनी धूळ चारली. या सामन्यात अभिषेक शर्माने शतकी खेळी खेळली. भारताने इंग्लंडला २४८ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १०.३ षटकात ९७ धावांवर गारद झाला.
इंग्लंडसाठी फिल साल्टने २३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार लगावत ५५ धावा कुटल्या. तर जॅकब बेथलने १० धावा कुटल्या. कर्णधार जोस बटलरने (७), हॅरी ब्रूक (२), लियाम लिव्हिंगस्टोन (९) सहित इंग्लंडचा आठ खेळाडूंना दहाचाही आकडा गाठता आला नाही . डकेटला खातेही उघडता आले नाही. भारतासाठी मोहम्मद शमीने तीन विकेट घेतले. वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेकने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. तर रवी बिष्णोईने एक बळी घेतला.
भारताने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २४७ धावा कुटल्या. भारतासाठी अभिषेक शर्माने जोरदार शतक ठोकलं. त्याने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकार ठोकले. भारतासाठी शिवम दुबेने ३० , तिलक वर्माने २४ धावा कुटल्या. संजू सॅमसन आणि अक्षय पटेलने अनुक्रमे १६ आणि १५ धावा कुटल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने २, हार्दिक पंड्या ९, रिंकू सिंह ९ धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सेने तीन आणि मार्क वुडने दोन गडी बाद केले. जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जेमीने एक-एक गडी बाद के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.