ICC T20 Cricketer Of The Year: सिंग इज किंग! भारताचा हा स्टार खेळाडू ठरला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर'

Arshdeep Singh: भारताचा स्टार खेळाडू अर्शदीप सिंगने आयसीसीने टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याचा मान पटकावला आहे.
ICC T20 Cricketer Of The Year: सिंग इज किंग! भारताचा हा स्टार खेळाडू ठरला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर'
teamindiasaam tv
Published On

भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा टी-२० क्रिकेटमध्ये चांगलाच डंका वाजतोय. त्याची २०२४ मध्ये आयसीसी टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजयाची नोंद केली होती. या स्पर्धेत अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीचा डंका पाहायला मिळाला होता. याच कामगिरीची दखल घेत त्याला हा मान देण्यात आला आहे.

अर्शदीप सिंगने २०२४ मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने गेल्या वर्षी एकूण १८ सामने खेळले. यादरम्यान त्याला ३६ गडी बाद करता आले. यासह २०२४ मध्ये टी-२० क्रिकेट खेळताना तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज देखील ठरला होता.

ICC T20 Cricketer Of The Year: सिंग इज किंग! भारताचा हा स्टार खेळाडू ठरला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर'
IND vs ENG 2nd T20I: आज रंगणार भारत- इंग्लंड दुसरा टी-२० सामना! खेळपट्टी कोणाला साथ देणार? Playing XI कशी असेल?

हे खेळाडूही होते शर्यतीत

अर्शदीप सिंगसह पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड आणि झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा देखील या शर्यतीत होता. बाबर आझमने गेल्या वर्षी फलंदाजी करताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने २३ डावात ३३.५४ च्या सरासरीने ७३८ धावा चोपल्या होत्या. तर हेडने २०२४ देखील टी-२० क्रिकेट खेळताना धावांचा पाऊस पाडला होता. त्याने ५३९ धावा जमा केल्या.

ICC T20 Cricketer Of The Year: सिंग इज किंग! भारताचा हा स्टार खेळाडू ठरला 'टी-२० क्रिकेटर ऑफ द ईयर'
IND vs ENG Record: इंग्लंडला नमवताच टीम इंडियाने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच संघ

अर्शदीप सिंगच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर अर्शदीप सिंग हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने शानदार सुरुवात करुन देत २ गडी बाद केले होते. यासह त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला. भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग अव्वल स्थानी आहे.

त्याने या रेकॉर्डमध्ये युझवेंद्र चहलला मागे सोडलं आहे. त्याने आतापर्यंत ६१ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८.२४ च्या इकोनॉमीने ९७ गडी बाद केले आहेत. त्याच्याकडे भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करणारा पहिला गोलंदाज बनण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com