भारताकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीसाठी 'बाउन्सर' टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. बलाढ्य संघाची कमकुवत दिसत असलेली गोलंदाजी 'धारदार' करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या कसोटी संघापासून चार वर्षे दूर असलेल्या जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघानं तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीय. भारताविरोधात लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्वाचा बदल केला आहे. तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरची चार वर्षांनी संघात एन्ट्री झाली आहे. जोश टंगच्या जागी आर्चरला संघात स्थान दिलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू होणार आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांना आर्चरच्या तिखट माऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आर्चर हा बऱ्याच वर्षांनी कसोटी संघात खेळणार आहे. तो अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. मालिकेच्या पहिल्या कसोटीत पाच विकेट राखून विजय मिळवल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत ३३६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानं कौटुंबिक कारणामुळं एजबेस्टनच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असून, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आर्चर हा पहिल्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता. मागील आठवड्यातच त्याला पहिल्यांदा या दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीनं आर्चर त्रस्त होता. मागील चार वर्षे त्याला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळालं नव्हतं. चार वर्षांपूर्वी तो अखेरचा कसोटी सामना भारताविरोधात खेळला होता. तो सामना अहमदाबादच्या मैदानावर झाला होता.
आर्चर २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीत तो १३ कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यानं ३१.०४ च्या सरासरीनं ४२ विकेट्स घेतल्या. त्यात २०१९ मधील अॅशेसमध्ये २०.२७ च्या सरासरीनं २० विकेट्स घेतल्या होत्या.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.